
मंत्री गुलाबराव पाटील आपल्या कडक स्वभावासाठी अन् सडेतोड भाषणांसाठी ओळखले जातात. पण स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांचे एक अनोखे रुप पहावयास मिळाले. त्यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात ‘दिल दिया है ज
.
मंत्री गुलाबराव पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे बडे नेते आहेत. ते आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अनेकदा ते कव्वाली, गाणी, लावणी सादर करतात. तसेच मिरवणुकीतही ठेका धरतात. त्याची प्रचिती गुरूवारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात आली. याठिकाणी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे गुरूवारी सायंकाळी हर घर तिरंगा संगीत रजनी आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार सुरेश भोळे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, पोलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे
यावेळी उपस्थितांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे देशभक्तीपर गीत सादर करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर पाटलांनी कोणतेही आढेवेढे न घेता थेट मंचावर जाऊन माईक आपल्या हाती घेतला. त्यानंतर कर्मा या हिंदी चित्रपटातील ‘दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए’ हे गीत सादर केले. त्यांचे गाणे सादर करण्याची कला पाहून संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले.
कोण आहेत गुलाबराव पाटील?
गुलाबराव रघुनाथ पाटील हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकारणी आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. 5 जून 1966 रोजी जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे जन्मलेल्या गुलाबरावांनी कोणताही राजकीय वारसा नसताना आपल्या संघटन कौशल्य आणि प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर राजकारणात स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांनी वयाच्या 25 व्या वर्षी पाळधी येथे शिवसेनेची शाखा स्थापन केली आणि 1991 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेत त्यांच्या प्रभावी भाषणाने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांचा जीवनप्रवास संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात पानटपरी चालवणाऱ्या साध्या व्यक्तीपासून ते राज्याच्या मंत्रिपदापर्यंतचा त्यांचा प्रवास त्यांच्या मेहनतीचे आणि लोकसेवेच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अनेक आंदोलने केली, विशेषतः वीज प्रश्नावरील शिंगाडे मोर्चामुळे ते लोकप्रिय झाले. त्यांचे आक्रमक वक्तृत्व आणि लोकांशी थेट संपर्क यामुळे त्यांना ‘खानदेशची मुलुख मैदानी तोफ’ असेही संबोधले जाते.
खाली पाहा व्हिडिओ
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.