- Marathi News
- National
- Case Of Two Women Being Paraded Naked In Manipur, Torture And Violence Two Years Ago; Today The Same Victim Is Facing Charges..
डी. कुमार | गुवाहाटी18 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
‘त्या दिवशी त्यांना भरबाजारातून विवस्त्र फिरवण्यात आले. जमावाने त्यांच्या शरीराचे लचके तोडले. त्या माझ्या नातेवाईक आहेत. पण त्यांना स्वत:ची ओळख पुसायचीये. म्हणूनच त्या आपल्या नावाचाच तिरस्कार करतात. त्यांना कुणी ओळखू नये म्हणून त्यांनी दोन वर्षांपासून ४-५ घरे बदलली आहेत. गेल्या वर्षी तर एका पीडितेने आत्महत्येचाही प्रयत्न केला. दोघीही जिवंत आहेत. पण जणू निर्जीवच. त्यांची पोलिस केस कोणत्या स्थितीत आहे, माहिती नाही. यापेक्षा जास्त सांगू शकत नाही.’ हे सांगताना थांगचिनला (नाव बदलले) रडू येते. त्यांची बहीण आणि पुतणीचाच व्हिडिओ २ मे २०२३ रोजी व्हायरल झाला होता.
राष्ट्रपती राजवटीवर रोष…
मणिपूरमध्ये १३ फेब्रुवारीपासून राष्ट्रपती राजवट आहे. परंतु विद्यमान विधानसभा विसर्जित झालेली नाही. केवळ निलंबित आहे. म्हणून अनेक नागरी संघटना विरोधात उतरल्या. काही दिवसांपूर्वी २१ आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाह यांना पत्र पाठवून राज्यात तत्काळी सरकार स्थापण्याची मागणी केली होती.
‘त्या दिवशी त्यांना भरबाजारातून विवस्त्र फिरवण्यात आले. जमावाने त्यांच्या शरीराचे लचके तोडले. त्या माझ्या नातेवाईक आहेत. पण त्यांना स्वत:ची ओळख पुसायचीये. म्हणूनच त्या आपल्या नावाचाच तिरस्कार करतात. त्यांना कुणी ओळखू नये म्हणून त्यांनी दोन वर्षांपासून ४-५ घरे बदलली आहेत. गेल्या वर्षी तर एका पीडितेने आत्महत्येचाही प्रयत्न केला. दोघीही जिवंत आहेत. पण जणू निर्जीवच. त्यांची पोलिस केस कोणत्या स्थितीत आहे, माहिती नाही. यापेक्षा जास्त सांगू शकत नाही.’ हे सांगताना थांगचिनला (नाव बदलले) रडू येते. त्यांची बहीण आणि पुतणीचाच व्हिडिओ २ मे २०२३ रोजी व्हायरल झाला होता.
त्यानंतर हिंसाचार भडकला. त्यात आजही मणिपूर होरपळत आहे. ‘दिव्य मराठी’ ने दोन्ही पीडितांशी संवादाचा प्रयत्न केला. पण त्या एक शब्दही बोलू शकल्या नाहीत. यांच्यासारख्या अनेक पीडित आहेत. त्या काहीही बोलण्यास तयार नाहीत. मणिपूरमध्ये मैतेई व कुकी समुदायांतील भडकलेल्या हिंसाचाराला शनिवारी दोन वर्षे पूर्ण होतील. मात्र दोन्ही समुदायांतील घृणा आणखीनच वाढत चालली आहे. या दरम्यान २५० हून जास्त मृत्यू झाले. ५० हजार लोक आजही विस्थापित आहेत. ६ हजार एफआयआर दाखल झाले. त्यात सुमारे २५०० मध्ये कारवाई पुढे सरकू शकलेली नाही. गंभीर गुन्ह्यांत सीबीआय किंवा राज्य सरकार कोणतेही अपडेट देण्यास तयार नाही.
मैतेईंचे जनसंमेलन, कुकींचा ५ जिल्ह्यांत बंद
समुदायाची प्रमुख संघटना कुकी स्टुडंट्स ऑर्गनायझेशन म्हणाले, आमच्या भागात शनिवारी बाजार, शाळा बंद असतील. आम्ही हा दिवस मैतेई समुदायापासून विलग झाल्याबद्दल साजरा करू. आम्हाला त्यांची साथ नको. कुकी समुदायाने त्यास ‘राज्य प्रायोजित जातीय धार्मिक नरसंहाराचा दुसरा स्मृतीदिन’ असे नाव दिले आहे. मैतेईंची प्रमुख संघटना कोकोमी संपूर्ण राज्यात मणिपूर जनसंमेलन साजरे करेल. त्यात नागरी संघटनांच्या नेत्यांना बोलावण्यात आले आहे. त्यात अनेक मोठे निर्णय घेतले जातील.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.