digital products downloads

मणिपूरमध्ये मुक्त संचारासाठी मैतेई तयार, कुकी सीमा न उघडण्यावर ठाम: शाह यांच्या डेडलाइनचा शेवटचा दिवस उद्या, मतैक्य कठीण

मणिपूरमध्ये मुक्त संचारासाठी मैतेई तयार, कुकी सीमा न उघडण्यावर ठाम:  शाह यांच्या डेडलाइनचा शेवटचा दिवस उद्या, मतैक्य कठीण

  • Marathi News
  • National
  • Meitei Ready For Free Movement In Manipur, Kuki Adamant On Not Opening Border, Shah’s Deadline Is Tomorrow, Consensus Difficult

डी. कुमार | गुवाहाटी2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

हिंसाचार आणि राजकीय उलथापालथीदरम्यान गेल्या ६७५ दिवसांपासून अशांत राहिलेल्या मणिपूरमध्ये सद्भावनेच्या दुसऱ्या प्रयत्नाची डेडलाइन उद्या, म्हणजे ८ मार्चला संपत आहे. मात्र, स्थिती सुधारण्याची शक्यता कमी दिसत आहे. कारण, कुकी संघटनांनी आपल्या सीमा मैतेईंसाठी उघडणार नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. मैतेईशी संबंधित नागरी संघटन आपली सीमा कुकी लाेकांसाठी खोलण्यास तयार आहे. मात्र, त्यांना जीवाची भीती आहे. जे लोक हिंसाचारात कुकी भागांतून घरदार सोडू गेले होते, ते परतण्यास तयार नाहीत. राज्यपाल अधिकारी आणि सुरक्षा दलांद्वारे समजावत आहेत की,त्यांनी राज्यात काेणत्याही व्यक्तीला प्रवेश करण्यापासून रोखू नये.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षा दलांना सांगितले होते की, ते ८ मार्चपर्यंत राज्यात लोकांना मोकळपणाने फिरण्यासाठी सुरक्षा निश्चित करावी. मैतेई संबंधित फेडरेशन ऑफ सिव्हिल सोसायटी ऑर्गनायजेशनने यावर आक्षेप व्यक्त केला आणि ८ मार्चला शांतता सद्भावना रॅली काढण्याची योजना आखली आहे.अशात लोकांचा मुक्त संचार कठीण दिसत आहे.

मैतेई म्हणाले, मे २०२३ पासून जिथे जाऊ शकत नव्हतो, तिथवर रॅली काढू

मैतेई फेडरशेनचे अध्यक्ष टी. मनिहार यांनी सांगितले की, आमच्या २० संघटनांनी गृहमंत्र्यांशी चर्चेनंतर सद्भावना रॅली काढण्याचा िनर्णय घेतला आहे. रॅली रेड झोनच्या भागात काढली जाईल, जिथे ३ मे २०२३ नंतर आमच्या येण्या-जाण्यावर बंदी आहे. मैतेईची लोकसंख्या इंफाळ ईस्ट, इंफाळ वेस्ट, विष्णूपूर, थौबल, काकचिंग जिल्ह्यांत आहे.

५७ हजारांहून जास्त निर्वासित… पोलिसही आपला भाग सोडायला भितात

राज्यात ५७ हजारांपेक्षा जास्त लोक २ वर्षांपासून मदत छावण्यांत राहत आहेत. केंद्राने शांतता स्थापन करण्याची विनंती केली आहे. मात्र, या लोकांनुसार, जोवर जिवाच्या सुरक्षेची हमी सरकार देत नाही, तोवर आम्ही परतणार नाहीत. कोकोमी नेत्यानुसार, सामान्य लोकाचे म्हणणे सोडा, मणिपूर पोलिसाचे जवानही आपला भाग सोडून जाऊ शकले नाहीत. आधी सुरक्षा दलांना या भागात तैनात केले जावे, तेव्हाच आम्ही परतण्याचा विचार करू.

कुकी म्हणाले, स्वतंत्र प्रशासन पद्धती मिळत, तोवर सीमा खुली होणार नाही

कुकीची प्रमुख संघटना कमेटी ऑन ट्रायबल युनिटी आणि कुकी महिला मानवी हक्क संघटनेने स्पष्ट सांगितले की, हिंसाचारात आमचे जास्त जीव गेले. जोवर त्यांना न्याय आणि स्वतंत्र प्रशासनाची मागणी पूर्ण होत नाही, तोवर मैतेईना येऊ देणार नाहीत. मणिपूरच्या चुराचांदपूर, कांगपोक्पी, चंदेल, टेंगनाउपोल व फ्रिजेल कुकीबहूल जिल्हे.

डोंगरांवर छापे, जवानांच्या निगराणीत पाठवताहेत आवश्यक सामग्री

मणिपूरमध्ये १३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती राजवट लागू केल्यावर लष्कर आणि केंद्रीय दलांची शस्त्र जप्ती मोहीम जारी आहे. याच्याशी संबंधित एका लष्करी अधिकाऱ्याने भास्करला सांगितले की, मैतेई भागांत लोक शस्त्र सोपवत आहेत, मात्र कुकीबहुल डोंगरी भागात अद्यापही लोक पुढे येत नाहीत. त्यामुळे येथे छापेमारची नवी योजना आखली आहे. आतापर्यंत १४०० हून जास्त घरांत सर्चिंगमध्ये सुमारे ३०० शस्त्र मिळाली आहेत. राज्यता येणाऱ्या जीवनावश्यक सामग्रीचे ट्रक सुरक्षा दल आपल्या निगराणीखाली गोदामापर्यंत पोहोचवत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp