
- Marathi News
- National
- Signs Of Peace In Manipur, Thadou Kuki Citizens Ready For Talks, Activities After Supreme Court Justice Returns From Manipur
डी. कुमार | इंफाळ/गुवाहाटी26 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीची माहिती घेऊन सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश परत येऊन १० दिवस झाले आहेत. मात्र, मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या ५० हजारांहून अधिक निर्वासितांच्या जीवनात अद्याप कोणताही बदल झालेला नाही. या दौऱ्यामुळे मोठ्या बदलाची अपेक्षा होती, परंतु सध्या काहीही झालेले नाही. मात्र, मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये शांततेचा मार्ग शोधण्यासाठी एक प्रयत्न सुरू झाला आहे.मैतेईंच्या प्रमुख संघटना कोऑर्डिनेटिंग कमिटी ऑन मणिपुर इंटीग्रिटीच्या (कोकोमी) एका नेत्याने सांगितले की, शांततेसाठी दोन्ही पक्षांनी चर्चा करणे आवश्यक आहे. थादोऊ कुकी जमातीच्या काही लोकांनी चर्चेची ऑफर दिली आहे. कोकोमीचे लोक आता पुढील आठवड्यात प्रत्येक मैतेईच्या घरी जाऊन या संदर्भात चर्चा करतील. सर्व लोकांचे जे मत असेल, तोच अंतिम निर्णय असेल. मात्र, कुकी नेत्यांचे म्हणणे आहे की, थादोऊ जमातीचे लोक दिल्लीमध्ये बसून मैतेईंशी चर्चेची ऑफर देत आहेत, त्यांना मणिपूरच्या कुकी संघटनांचे समर्थन नाही.
एका लष्करी आणि एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, राज्यात १३ फेब्रुवारीपासून राष्ट्रपती शासन आहे. त्यामुळे काही कामे खूप चांगली झाली आहेत. उदाहरणार्थ, जे लोक पूर्वी शस्त्रे घेऊन खुलेआम फिरत होते, ते गायब आहेत. जिथे गोळीबार होत होता, तिथे शांतता आहे. थादोऊ मणिपुरच्या २९ मूळ/स्वदेशी जमातींपैकी एक आहे, ज्याला भारत सरकारच्या १९५६ च्या राष्ट्रपती आदेशानुसार स्वतंत्र अनुसूचित जमात म्हणून मान्यता देण्यात आली होती. लोकसंख्येच्या दृष्टीने थादोऊ मणिपूरमधील दुसरी सर्वात मोठी जमात आहे.
मदत छावण्यांत स्थिती दयनीय, औषधाविना रुग्णांचे मृत्यू…
डोंगराळ जिल्हा चूराचांदपूरच्या सद्भावना मंडप मदत छावणीत न्यायाधीशांना भेटलेले केनेडी हाओकिप यांनी भास्करला सांगितले की, त्या दौऱ्यानंतर काय योजना बनल्या, याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडून काहीही सांगितले जात नाही. न्यायाधीशांना मी सांगितले होते की, आम्ही कशा प्रकारचे जीवन जगत आहोत. चूराचांदपूरच्या ५० छावण्यांत ८ हजार लोक आहेत, ज्यांपैकी अनेक आजारी आहेत. रुग्णांची काळजी घेणाऱ्या एका डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, आमच्या सरकारी रुग्णालयात औषधे संपली आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.