digital products downloads

मणिपूरमध्ये सरकार स्थापनेनंतर हिंसाचार: उपमुख्यमंत्र्यांना धमकी, सरकारमध्ये कुकी आमदार, आज बंदचे आवाहन

मणिपूरमध्ये सरकार स्थापनेनंतर हिंसाचार:  उपमुख्यमंत्र्यांना धमकी, सरकारमध्ये कुकी आमदार, आज बंदचे आवाहन

  • Marathi News
  • National
  • Violence After Government Formation In Manipur, Threats To Deputy Chief Minister, Kuki MLAs In Government, Call For Bandh Today

सत्यनारायण मिश्र | इंफाळ44 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

मणिपूरमध्ये नवीन सरकार स्थापन होऊन चोवीस तास उलटण्यापूर्वीच गुरुवारी रात्री चुराचांदपूरमध्ये हिंसाचार भडकला. तुईबोंग परिसरात कुकी-जो ग्रुप्स (जेएफ7) कडून पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान हिंसक निदर्शने झाली. आंदोलकांनी टायर आणि लाकूड जाळले. रस्ते जाम केले आणि सुरक्षा दलांवर दगडफेक केली. यामुळे पोलिसांच्या वाहनांचेही नुकसान झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलांनी अतिरिक्त कुमक लावली, मात्र आंदोलकांच्या संतापामुळे सुरक्षा दलांनाही स्वतःचा बचाव करावा लागला.

याच दरम्यान, नवीन सरकारमध्ये नेम्चा किप्गेन उपमुख्यमंत्री झाल्याने कुकी समुदायात फूट पडली. एका संघटनेने विश्वासघात आणि मैतेई लोकांशी युती केल्याचा आरोप करत सरकारमध्ये सहभागी असलेल्या तिन्ही कुकी आमदारांवर सामाजिक बहिष्काराची घोषणा केली आहे. जॉइंट फोरम ऑफ सेवन संघटनेने चुराचांदपूरमध्ये शुक्रवारी १२ तासांचा बंद पुकारला आहे.

करारावरील सस्पेन्समुळे वाद

२ फेब्रुवारी रोजी कुकी आमदारांनी दिलेल्या निवेदनात समुदायाच्या नेत्यांशी चर्चेनंतरच सरकारमध्ये सामील होण्याबाबत सांगितले होते. मात्र, नेम्चा यांनी दिल्लीत नेमकी काय चर्चा केली, यावरून पडदा हटलेला नाही. यामुळे वादाची स्थिती निर्माण झाली.मोठ्या गटानुसार आमदारांनी विश्वासघात केला. समुदाय सुरक्षा,विकासासाठी सरकारमध्ये गेल्याचा दावा समर्थकांनी केला.

१० कुकी आमदार, ७ भाजपचे

विधानसभेत १० कुकी आमदार आहेत.त्यात ७ भाजपचे आहेत. हमार जमातीचे आमदार एन सेनाते भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए टीमचा भाग होते. याच टीमने सरकार स्थापनेचा दावा मांडला होता. कुकी आमदार एलएम खौटे देखील या टीममध्ये होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp