digital products downloads

मतदान केंद्रांवर तुम्हाला काय असतात सुविधा,अधिकार? Voting ला जाण्याआधी माहिती करुन घ्या!

मतदान केंद्रांवर तुम्हाला काय असतात सुविधा,अधिकार? Voting ला जाण्याआधी माहिती करुन घ्या!

Voter Right at Poling Booth: मुंबई महानगरपालिकेची 2025-26 ची सार्वजनिक निवडणूक निर्भीड, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी पालिका प्रशासन पूर्णपणे तयार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार सर्व योजना वेळेनुसार आणि प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांशी समन्वय साधून कडक सुरक्षा बंदोबस्त, सतत गस्त आणि विशेष पथके तैनात केली आहेत. कोणत्याही दबाव, प्रलोभन किंवा आचारसंहिता उल्लंघनाला मुळीच सहन केले जाणार नाही. आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबईकरांना निर्भीडपणे मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. मतदान 15 जानेवारी 2026 रोजी आणि मतमोजणी 16 जानेवारी रोजी होणार आहे.

Add Zee News as a Preferred Source

प्रभाग रचना 

प्रभाग रचना नगर विकास विभागाच्या 10 जून 2025 च्या आदेशानुसार करण्यात आली असून ज्याचे प्रारूप 22 ऑगस्ट रोजी आणि अंतिम रचना 6 ऑक्टोबर 2025 रोजी राजपत्रात प्रसिद्ध झाले. आरक्षणासाठी आयोगाच्या 26 ऑक्टोबरच्या आदेशानुसार 11 नोव्हेंबर रोजी सोडत झाली. प्रारूप 14 नोव्हेंबर आणि अंतिम आरक्षण 28 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाले. एकूण 227 जागांपैकी अनुसूचित जातींसाठी 15 (महिला 8), अनुसूचित जमातींसाठी 2 (महिला 1), मागासवर्गासाठी 61 (महिला 31) आणि सर्वसाधारणसाठी 149 (महिला 74) जागा आहेत.

मतदार संख्या

मुंबईत एकूण 1 कोटी 3 लाख 44 हजार 315 मतदार आहेत, त्यात पुरुष 55 लाख 16 हजार 707, महिला 48 लाख 26 हजार 509 आणि इतर 1099. मतदारांना नाव, पत्ता, केंद्र माहिती असलेल्या मतदार चिठ्ठ्या घरोघरी वाटण्यात आल्या आहेत.  हे वितरण अचूक आणि वेळेवर होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. 

उमेदवार आणि मतदान केंद्रांची व्यवस्था

अंतिम पात्र उमेदवार 1700 आहेत, त्यात पुरुष 822 आणि महिला 878. मतदानाची ठिकाणे 2278 आणि केंद्रे 10231 आहेत. शासकीय इमारतींमध्ये 2382 बंदिस्त, 879 अर्धबंदिस्त आणि 1143 खुल्या जागा; सहकारी संस्थांमध्ये 181 बंदिस्त, 312 अर्धबंदिस्त आणि 209 खुल्या; खासगी इमारतींमध्ये 2693 बंदिस्त, 1385 अर्धबंदिस्त आणि 1047 खुल्या जागा आहेत.

मतदान केंद्रांवर काय सुविधा? 

प्रत्येक केंद्रावर पिण्याचे पाणी, प्रतीक्षा शेड, स्वच्छता गृह, प्रकाश, दिव्यांगांसाठी रॅम्प आणि व्हीलचेअर, दिशादर्शक फलक उपलब्ध आहेत. दिव्यांग, गर्भवती आणि ज्येष्ठांना प्राधान्य देण्यात येते. प्रत्येक प्रभागात एक गुलाबी/सखी केंद्र महिलांकडून चालवले जात आहे. ज्यात सर्व कर्मचारी महिला असतील. तसेच एक आदर्श केंद्र गुलाबी रंगसंगतीत सजवण्यात आले आहे.

कर्मचारी, स्वयंसेवक आणि नियुक्त्या

मतदानासाठी 64 हजार 375 कर्मचारी नेमले आहेत, त्यात प्रत्येकी 12 हजार 875 केंद्राध्यक्ष, सहायक, अधिकारी क्र.1-2 आणि शिपाई. हलगर्जीपणावर कडक कारवाई केली जाणार आहे. 4500 स्वयंसेवक रांग व्यवस्था, गर्दी नियंत्रण आणि मदतीसाठी तैनात आहेत. 23 मध्यवर्ती कार्यालयांसाठी निवडणूक अधिकारी आणि 1,472 क्षेत्रीय अधिकारी नेमण्यात आले आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp