
मद्यप्राशन करून कर्तव्यावर आलेल्या श्रेणी पोलिस उपनिरीक्षकावर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, त्यांचे पोलिस खात्यातून निलंबन करण्यात आले आहे. संजय सुधाकर माटेकर असे निलंबीत करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकांचे नाव आहे. याबाबतचे आदेश वाहतू
.
श्रेणी पोलिस उपनिरीक्षक माटेकर हे लष्कर वाहतूक विभागात नेमणूकीस आहेत. ते २९ जुलै रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह (डी.डी) कारवाईसाठी कर्तव्यावर होते. त्यांनी कारवाईसाठी एक चारचाकी गाडी थांबविली. गाडीतील तिघा व्यक्तींसोबत वाद घातला. दरम्यान, यावेळी माटेकर यांनी मद्यपान केले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर माटेकर यांच्या विरुद्ध कर्तव्याच्या ठिकाणी मद्याचे सेवन केल्यामुळे लष्कर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माटेकर यांनी कर्तव्य पार पाडत असताना,बेशिस्त बेजबाबदारपनाचे व पोलिस खात्यात अशोभनिय असे गैरवर्तन करून अत्यंत गंभीर स्वरुपाची कसूरी केल्याने, पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबीत करण्यात आले आहे.
पीएमपी प्रवासी महिलेकडील पावणेदोन लाखांची बांगडी लंपास
पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेकडील पावणेदोन लाखांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना शंकरशेठ रस्त्यावर घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका ज्येष्ठ महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ६५ वर्षीय महिला कोथरूड भागात राहायला आहेत. त्या पीएमपी बसने प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. चोरट्यांनी गर्दीत कटरचा वापर करुन त्यांच्या हातातील पावणेदोन लाख रुपयांची सोन्याची बांगडी चोरून नेली. पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोपे तपास करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.