
अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी शनिवारी मनपा शाळांची पाहणी केली. त्यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसह नागपुरी गेट येथील मनपा प्राथमिक हिंदी शाळा क्रमांक १२ आणि मुजफ्फरपुरा येथील मनपा उर्दू उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा क्रमा
.
आयुक्तांनी शाळांमधील स्वच्छता, स्वच्छतागृहाचे बांधकाम आणि वर्गखोल्यांमधील सुविधांची पाहणी केली. हिंदी शाळा क्रमांक १२ साठी नवीन इमारत बांधण्याचे आदेश दिले. उर्दू शाळा क्रमांक ७ मध्ये अर्धवट इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत डेस्क-बेंचची सुविधा आणि विज्ञान प्रयोगशाळा उभारण्याचे आदेश दिले. या दौऱ्यात मनपा शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, शहर अभियंता रवींद्र पवार यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण हे महानगरपालिकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यांनी मनपाच्या शाळा इतर शाळांच्या बरोबरीने नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.