
Manoj Jarange Maratha Morcha : मनोज जरांगे यांच्या उपोषणाला एक दिवस झाल्यानंतरही राज्य शासनाकडून जरांगे यांच्याशी कोणताही संपर्क झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी आंदोलनस्थळी चर्चा करण्यासाठी सरकारकडून शिष्टमंडळ येणार अशी माहिती मिळाली होती. मात्र अजूनही याबाबत सरकार दरबारी कुठल्याही हालचाली दिसून येत नाहीयेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सरकारकडून मनोज जरांगे यांना संपर्क केला जाण्याची शक्यता असून, आरक्षणाच्या उपसमितीची बैठक झाल्यानंतर कदाचित चर्चेसाठी सरकारकडून हालचाली सुरू होतील.
आणखी मराठा आंदोलक मुंबई गाठणार… आंदोलन लांबवण्याची जरांगेंची रणनिती?
मुंबईत सुरू असणारं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन लांबवण्याची रणनिती जरांगेंची असल्याची माहिती आता समोर येत आहे. आठ तासांसाठी मुंबईत आलेल्या जरांगेंना मुंबईत आठ दिवस मुक्काम ठोकायचा आहे असं स्पष्ट होत असून, आंदोलनाचे आठ टप्पे असून आता आंदोलनाचा पहिला टप्पाच सुरु झाल्याचं जरांगेंनी सांगितलंय. इतकंच नव्हे, तर बुधवारी आणि गुरुवारी आणखी मराठा आंदोलक मुंबईत येतील अशी माहिती जरांगेंनी दिली आहे. ज्यामुळं जरांगे आझाद मैदानातील आंदोलन लांबवण्याच्या मानसिकतेत असल्यानं सरकारवर दबाव वाढल्याचं स्पष्ट पाहायला मिळत आहे.
जरांगेंच्या या रणनितीमुळं मुंबईत 4 सप्टेंबरपर्यंत आंदोलन करण्याचे संकेत मिळत असून, जरांगेंचं उपोषण आणखी किती दिवस लांबणार? त्यांची जरांगेंची घोषणा म्हणजे दबावतंत्र आहे का? असेच प्रश्न उपस्थित होत आहेत.
आंदोलनाची सद्यस्थिती काय?
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला एक दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्यामुळं शनिवार 30 ऑगस्ट रोजीसुद्धा मनोज जरांगेंचं आझाद मैदानात आंदोलन सुरु राहणार आहे. ‘आरक्षण द्या नाहीतर गोळ्या घाला’ अशी रोखठोक भूमिका यावेळी मनोज जरागेंनी घेतली आहे. तसेच मराठा आंदोलकांना जेवण आणि पाणी मिळू न दिल्याचा आरोपही यावेळी जरांगेंनी केलाय. तसंच सरकारनं मराठा आंदोलकांच्या गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणीही जरांगेंनी केली ज्यानंतर जरांगेंच्या मागणीनंतर पोलिसांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
FAQ
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची मुख्य मागणी काय आहे?
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात 10% आरक्षण, सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र, आणि सरकारी नोकऱ्या व शिक्षणात आरक्षणाची मागणी आहे. तसेच, हैदराबाद गॅझेट आणि इतर ऐतिहासिक नोंदींनुसार कुणबी प्रमाणपत्रे देण्याची मागणी आहे.
आंदोलन किती काळ चालण्याची शक्यता आहे?
जरांगे यांनी आंदोलन आठ टप्प्यांमध्ये आयोजित करण्याची योजना जाहीर केली आहे, ज्यामुळे ते 4 सप्टेंबर 2025 पर्यंत लांबण्याची शक्यता आहे. बुधवार-गुरुवार (2-3 सप्टेंबर) आणखी आंदोलक मुंबईत दाखल होतील.
सरकारकडून कोणती पावले उचलली गेली आहेत?
सरकारने अद्याप जरांगे यांच्याशी अधिकृत संपर्क साधलेला नाही. शनिवारी (30 ऑगस्ट) मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर चर्चेची शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.