
Manoj Jarange : मनोज जरांगे मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनलेत… मात्र या आंदोलनात त्यांचे काही विश्वासू सहकारी या आंदोलनाची जबाबदारी सांभाळतात… कोण आहेत जरांगेचे विश्वासू सहकारी पाहुयात हा रिपोर्ट…
मराठ्यांना सगेसोय-यांसह ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी पुन्हा आंदोलन सुरु केलंय.. लाखो समर्थकांसह मुंबईतील आझाद मैदानावर या मागणीसाठी आमरण उपोषम करताय.. आंदोलनाची त्यांची ही पहिलीच वेळ नाहीये.. तर या आधीही त्यांनी अनेक आंदोलनं केलीत.. या आंदोलनात त्यांना मदत केलीये त्यांच्या आठ विश्वासू साथिदारांनी.. आता पर्यंत जरांगेंच्या या साथिदारांची फारशी कुणाला माहिती नव्हती.. मात्र त्यांचे हे विश्वासू साथिदार कोण आहेत पाहूयात…
श्रीराम कुरणकर
मनोज जरांगे यांचा सर्वात विश्वासू सहकारी. शिवबा संघटनेच्या स्थापनेपासूनचे जुने सहकारी. कुरणकर यांचा कोपर्डी आंदोलनातही सहभाग होता. कुरणकर हे जरांगे-पाटील यांचे बाल मित्र आहेत. प्रशासकीय कामे, मंत्र्यांचे संपर्क, फोन,महत्वाचे निरोप हे विषय ते हाताळतात.
दादासाहेब घाडगे
दादासाहेब घाटगे हे देखील मनोज जरांगे पाटील यांचे विश्वासू सहकारी आणि मित्र आहेत. जरांगेंच्या अंतरवाली सराटी गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आहेत.
संजय कटारे
संजय कटारे हे देखील मराठा आरक्षणाच्या आंदोनात जरांगे पाटील यांचे जवळचे सहकारी आहेत. गोदा काठच्या 123 गावातील सर्वात विश्वासू सहकारी म्हणून ते ओळखले जातात. या आंदोलनाचं सर्व नियोजनाची कामं कटारे करतात.
रमेश काळे
रमेश काळे हे वडीवाळा गावाचे सरपंच आहेत. ओबासी वर्गातील असूनही ते जरांगे यांचे कट्टर सहकारी आहेत. ते अंगरक्षकाप्रमाणे जरांगे यांच्या सोबत राहणारे सहकारी आहेत.
पांडुरंग तारख
अंतरावली सराटी या गावचे सरपंच असलेले पांडुरंग तराख हे देखील जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. सर्वात मोठ्या सभेच्या आयोजनात त्यांचा सक्रीय सहभाग असतो.
गंगाधर काळकुटे
गंगाधर काळकुटे हे मराठा आरक्षणाच्या साष्ट पिंपळगाव आंदोलनापासून जरांगे यांचे विश्वासू सहकारी आहेत. जरांगे यांच्या दौ-याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते. तसंच बीड जिल्ह्यातील नियोजनाचं काम ही काळकुटे सांभाळतात.
नारायण शिंदे
नारायण शिंदे हे नागझरीचे सरपंच आहेत. जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाचे नियोजन, त्यासाठी बैठका घेण्याची त्यांच्यावर जबाबदारी असते.
प्रदीपदादा सोळुंके
मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यातील दौऱ्याचं तसंच त्यांच्या सभेच्या नियोजनाचं काम प्रदीपदादा सोळुंके पाहतात.
यांच्यासह लाखो मराठा बांधवांचा भक्कम पाठिंबा जरांगे यांच्या पाठीशी असतो.. त्यामुळेच त्यांच्या आतापर्यंतच्या प्रत्येक आंदोलना त्यांना यश आलंय..
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.