
Maharashtra Weather News : यावर्षी भारतासह महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम वाढला आहे. ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली असूनही वरुणराजा जाण्याची काही चिन्ह दिसत नाहीय. मराठवाडा आणि सोलापुरात सप्टेंबर महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला. अशात पावसाबद्दल हवामान विभागाने आज (3 ऑक्टोबर 2025) काय अंदाज वर्तवला आहे, जाणून घ्या.
तर आज कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला गेला आहे. तर मध्य महाराष्ट्रात पुणे,सातारा, सांगली, अहिल्यानगर, नाशिक, कोल्हापूरसह अनके जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणाबद्दल बोलायचं झालं तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांपैकी काही ठिकाणी हलक्या पावसाचा सरी बरसणार आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये आकाश स्वच्छ राहणार असून पावसाचा काही अंदाज नाही. तरदुसरीकडे मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांत हलका पाऊस शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर या जिल्ह्यात वरुणराजा बरसणार आहे, त्यामुळे घराबाहेर पडताना छत्री, रेनकोट घेऊन घराबाहेर पडा.
Thunderstorm accompanied with lightning, light to moderate rain with gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of Marathwada.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/i83ijB36iS— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 2, 2025
पावसाने मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे अनेकांची शेती आणि घर उद्ध्वस्त झाली. त्याठिकाणी आजचं हवामान विभागाने काय अंदाज दर्शविला आहे, ते जाणून घ्या. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना या दोन जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशिव येथे वाऱ्यासह हलका पाऊस राहण्याची शक्यता असून येलो अलर्ट जारी हवामान विभागाने दिला आहे.
तर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये आज (3 ऑक्टोबर 2025) हवामानात काही प्रमाणात बदल दिसून येणार आहे. बऱ्याच दिवसांनी सूर्यदेवाने जरी सकाळी दर्शन दिलं असलं तरी धुके आणि ढगाळ हवामान दिसून येतं आहे. तर दुपारनंतर पावसाची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे.
दिवसभराच्या बातम्यासाठी झी२४ तास पाहा
FAQ
1: यावर्षी महाराष्ट्रात पावसाची स्थिती काय आहे?
उत्तर: यावर्षी भारतासह महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम वाढला आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानेही पावसाने थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. सप्टेंबरमध्ये मराठवाडा आणि सोलापूरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला होता.
2: आज (३ ऑक्टोबर २०२५) महाराष्ट्रात एकूण हवामानाचा अंदाज काय आहे?
उत्तर: हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बहुतेक ठिकाणी हलकाच पाऊस अपेक्षित आहे.
3: कोकणातील जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज काय?
उत्तर: कोकणात रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांपैकी काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरशील. काही ठिकाणी आकाश स्वच्छ राहील आणि पावसाची शक्यता नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.