
मुंबई : मनोज जरांगे पाटलांविरोधात आता राष्ट्रीय ओबीसी महासंघ (Rashtriya OBC Mahasangh) मैदानात उतरला आहे. ओबीसी महासंघानं जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मागण्यांना विरोध करत उपोषण करण्याची घोषणा केलीय. तसंच गरज पडल्यास मुंबईतही येणार असल्याचा इशारा ओबीसी महासंघाकडून देण्यात आलाय.
मनोज जरांगेंच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला राष्ट्रीय ओबीसी महासंघानं कडाडून विरोध केलाय. मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करत जरांगेंनी मुंबईकडे कूच केलीय. मात्र, जरांगेंच्या या मागणीविरोधात आता ओबीसी महासंघ देखील आक्रमक झालाय. जरांगेंच्या मागण्यांचा विचार केल्यास आम्ही देखील मुंबईत धडकणार असा थेट इशारा ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी दिलाय. ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन करण्यात येणार आहे. जरांगे पाटलांप्रमाणे ओबीसी महासंघानं देखील सरकारकडे अनेक मागण्या केल्या आहेत.
ओबीसी समाजाच्या मागण्या कोणत्या?
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी महासंघाचा विरोध
सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीलाही ओबीसी महासंघाचा विरोध
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावण्याचं आवाहन
एकीकडे बबनराव तायवाडेंनी ओबीसींवर अन्यात होत असल्याची भावना व्यक्त करत उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. दरम्यान त्यांच्या या आंदोलनाला इतर ओबीसी संघटनांनी देखील समर्थन दिलंय. तर दुसरीकडे मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नसल्याचं रामदास आठवलेंनी म्हटलंय.
मराठा आणि ओबीसींच्या संघर्षावरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही काँग्रेसची भूमिका आहे का? असा सवाल बावनकुळेंनी केलाय. जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यानंतर ओबीसी आणि मराठा असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी जरांगेंनी केलीय. तर जरांगेंच्या या मागणीविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक झालाय. त्यामुळे ओबीसी आणि मराठी पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची चिन्ह आहेत.
कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट, सुप्रीम कोर्टाकडून अरुण गवळीला जामीन मंजूर
FAQ :
मराठा आणि ओबीसी समाजातील वादाचा मुख्य मुद्दा काय आहे?
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. याला राष्ट्रीय ओबीसी महासंघाने कडाडून विरोध केला असून, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना का विरोध केला आहे?
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्याच्या आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला विरोध केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, यामुळे ओबीसी समाजाच्या विद्यमान आरक्षणाला धक्का लागेल
राष्ट्रीय ओबीसी महासंघ कोणत्या प्रकारचे आंदोलन करणार आहे?
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन आणि उपोषण करण्याची घोषणा केली आहे. गरज पडल्यास ते मुंबईतही आंदोलन करतील, असा इशारा ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.