
Maratha Reservation Manoj Jarange Patil Morcha : माराठ्यांचे भगवं वादळ मुंबईत धडकले आहे. मुंबईत सर्वत्र मराठा आंदोलक दिसत आहेत. आझाद मैदान परिसरात सर्व हॉटेल आणि चहाची दुकाने बंद करण्यात आली. यामुळे आंदोलकांनी रस्त्यावरच चुल मांडली. अशातच एक मराठा आंदोलक मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये गेला. ताज हॉटेलमध्ये गेलेल्या मराठा आंदोलकाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये एक मराठा आंदोलक लॉबी मध्ये बसलेला तसेच फिरताना दिसत आहे. त्याच्यासह आणखी चार पाच आंदोलक दिसत आहेत. एकाच्या हातात भगवा झेंडा आहे. तर, इतर आंदोलकांनी जरांगे यांचा फोटो असलेले टी शर्ट घातले आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला अवघ्या काही तासांच लाखो व्हिव्ह्य आले. हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला असून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मराठा आंदोलक ताज हॉटेलमध्ये काय करतोय? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळं घड्याळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबई दुस-या दिवशीही ठप्प झाली होती. मंत्रालय आणि सीएसएमटी, दलाल स्ट्रिट असलेल्या दक्षिण मुंबईचा कारभार तब्बल 5 ते 6 तास थांबला होता. सामान्यवेळी वाहनांमुळे ज्या रस्त्यावर मुंगीलाही चालायला जागा नसते तिथे आंदोलकांनी चक्क कांदेपोह्याचा बेत केला होता. भररस्त्यात नास्ता आणि जेवणाचं साहित्य मांडून आंदोलक स्वयंपाक करताना पाहयाला मिळाले. आझाद मैदान, सीएसएमटी आणि परिसरातली सगळी दुकानं कालपासून बंद आहेत. आंदोलक जी वाहनं घेऊन आलेत ती वाहनं लांबच्या ठिकाणी पार्क केल्यानं तिथं जाताही येत नव्हतं. त्यामुळं शुक्रवारी रात्री सक्तीचा उपवास घडला.
भुकेनं व्याकुळ झालेल्या मराठा आंदोलकांनी थेट सीएसएमटीसमोरच्या रस्त्यावरच नाश्त्यासाठी चुली मांडल्या. मराठा आंदोलकांनी सीएसएमटीसमोरच्या रस्त्यावर चुली मांडल्यानं दक्षिण मुंबईतली वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलकांनी मुंबई जाम केल्याबाबत जरांगेंना विचारले असता त्यांनी थेट महापालिका आयुक्तांनाच आरोपीच्या पिंज-यात उभं केलं. महापालिका आयुक्तांनी जाणीवपूर्वक मराठा आंदोलकांची अडवणूक केल्याचा आरोप त्यांनी केलाय. मराठ्यांचं पाणी बंद करणा-या आयुक्तांना आता सुट्टी नाही असा जरांगेस्टाईल इशारा देऊन टाकलाय.
मनोज जरांगेंचा पाणी, दुकानं बंद केल्याचा दावा महापालिकेने खोडून काढलाय. तसेच आंदोलनस्थळी महापालिकेने पुरवलेल्या सुविधांचा लेखाजोखाच दिला. सकाळी अकरानंतर महापालिका प्रशासनानं फिरती स्वच्छतागृहं आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली. आंदोलक त्यानंतर रस्त्यावरुन हटल्याचं पाहायला मिळालं. आंदोलकांनी सुविधा न मिळाल्यानं चक्काजाम करुन बीएससी प्रशासनाची कोंडी करुन मुलभूत सुविधा पदरात पाडून घेतल्या. या निमित्तानं मराठा आंदोलकांनी एकजूट आणि आंदोलनाची ताकद दाखवून दिली.
आंदोलनस्थळी मुंबई महापालिकेचा काय सुविधा?
आझाद मैदानातील चिखल हटवून खडी टाकली
रात्रीच्या पुरेशा प्रकाशासाठी विद्युत दिव्यांची सोय
आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याचे अतिरिक्त 11 टँकर्स
आझाद मैदान परिसरात स्वच्छतेसाठी कर्मचारी तैनात
वैद्यकीय मदत कक्ष उभारणी करून आरोग्य सेवा दिल्या जात आहेत
4 वैद्यकीय पथकं आणि 2 रुग्णवाहिका मैदान परिसरात 24 तास
आझाद मैदान आणि परिसरातील सर्व सार्वजनिक शौचालये आंदोलकांसाठी मोफत उपलब्ध
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदान परिसरात कीटकनाशक धूर फवारणीसाठी दोन पथकं तैनात
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.