
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील आझाद मैदान हे मराठा समाजाच्या आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरले होते. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येथे बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा समाजाचे नागरिक मुंबईत दाखल झाले. या आंदोलनाच्या दबाव
.
सरकारने जारी केलेल्या जीआरमुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याने, ओबीसी आरक्षण धोक्यात येईल अशी भावना ओबीसी समाजामध्ये निर्माण झाली आहे. यामुळे ओबीसी संघटना आक्रमक पवित्र्यात आल्या आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असला तरी तोडगा काढताना ओबीसींच्या हक्कांवर गदा आली, असा आरोप या संघटनांकडून केला जात आहे. विशेषतः मंत्री छगन भुजबळ यांनी या जीआरविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्यामुळे संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजानेही मुंबईत महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असून, दसऱ्यानंतर 8 किंवा 9 ऑक्टोबर रोजी भव्य ओबीसी महामोर्चा आयोजित करण्यात येणार आहे.
बैठक व छगन भुजबळांची भूमिका
आज ओबीसी समाजाच्या विविध संघटनांच्या नेत्यांची ऑनलाइन बैठक होणार आहे. या बैठकीत मोर्चाच्या तारखेवर अंतिम निर्णय घेण्यात येईल. प्राथमिक चर्चेनुसार, दसऱ्यानंतर लगेचच म्हणजे 8 किंवा 9 ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ ऑनलाइन सहभागी होण्याची शक्यता आहे. भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे की, कुणबी प्रमाणपत्रामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात येणार असल्यास त्याचा तीव्र विरोध केला जाईल. त्यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयीन लढाई उभारण्याची तयारी दर्शवली आहे.
ओबीसी महामोर्चा किती मोठा प्रतिसाद मिळवतो?
सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून आंदोलनाचा तात्पुरता तोडगा काढला असला तरी आता ओबीसी समाजाच्या असंतोषामुळे राज्यातील सामाजिक वातावरण आणखी ढवळून निघण्याची शक्यता आहे. मराठा व ओबीसी या दोन मोठ्या समाजघटकांच्या आरक्षणाच्या मागण्या आणि त्यावर होणारे निर्णय यामुळे महाराष्ट्राचे राजकारण व प्रशासन दोन्ही तणावाखाली आले आहे. दसऱ्यानंतर होणारा ओबीसी महामोर्चा किती मोठा प्रतिसाद मिळवतो? त्यानंतर सरकारची भूमिका काय असते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे आगामी काही आठवड्यांत महाराष्ट्रात आरक्षणावरून मोठे राजकीय व सामाजिक वादळ उठण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.