
मराठा आमदार धनंजय मुंडेंचं (Dhananjay Munde) खच्चीकरण करत असल्याचा गंभीर आणि थेट आरोप गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadavarte) यांनी केला आहे. मराठा आमदारांनी रिंगण करुन धनंजय मुंडेंना टार्गेट केल्याचा आरोप सदावर्तेंनी केला. ‘झी 24 तास’च्या ‘टू द पॉईंट’ मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला आहे. ज्याप्रकारे मराठा आमदारांनी रिंगण करुन, ठरवून धनंजय मुंडे यांना त्रास दिला, त्याच प्रकारचा त्रास आमच्या वंजारी समाजाचे दैवत भगवान बाबा यांनाही काही लोकांनी दिला होता असंही ते म्हणाले आहेत.
धनंजय मुंडे यांना पाठिंबा देण्यामागे काय भूमिका होती? असं विचारलं असता ते म्हणाले, “धनंजय मुंडे भटक्या विमुक्त समाजातून येतात. गोपीनाथ मुंडे हे खरोखर त्या भागात आधार होते. ज्या प्रकारे मराठा आमदारांनी रिंगण करुन, ठरवून धनंजय मुंडे यांना त्रास दिला, त्याच प्रकारचा त्रास आमच्या वंजारी समाजाचे दैवत भगवान बाबा यांनाही काही लोकांनी दिला होता. पुस्तक वाचून चिंतन केलं तर माणूस झोपू शकणार नाही. मी मराठा, मराठा म्हणणार नाही”.
“भटक्या, विमुक्त, ओबीसीतील मायक्रो ओबीसी असेल त्या सर्वांपरी माझं कर्तव्य आहे. मी माझ्या माणसांना कमी लेखू देणार नाही. मी कालही समर्थनात होतो आणि आजही आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हे लाडके भाऊ, मायक्रो ओबीसींसाठी लढणार आहे,” असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
पुढे ते म्हणाले, “पाटलाच्या घरी लेकरु जन्माला आलं की त्याचं राव होतं आणि आमच्या लोहोराच्या घऱी कितीही चांगलं नाव असलं तरी गण्या होतं आणि तिथे गणेशराव होतं. हा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.