
मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण मिळाले, तरी OBCचा आग्रह का? असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. तर मराठा समाजाला आधी मिळालेलं आरक्षण नको का?, शिक्षित मराठा नेत्यांनी यावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही मंत्री भुजबळ यांनी केली आहे. तर कुणी त
.
छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण का हवे आहे तर केवळ गाव पातळीवर काही सरपंच होतात एखादा दुसरा जिल्हा परिषद सदस्य होतो त्याला पुढे न्यायचे का नाही हे सुद्धा तिथला मराठा समाजच ठरवतो. मराठा समाजाकडे अनेक जिल्हा परिषद, आमदारकी आणि संस्था आहेत. मंत्री, मुख्यमंत्री अनेकवेळा तुमचेच आहे, केवळ राजकारणासाठी तुम्ही 10 टक्के आरक्षण आणि EWS आरक्षण नाकारणार का? असा सवालही भुजबळ यांनी म्हटले आहे.
राजकारणासाठी सर्व सोडणार का?
छगन भुजबळ म्हणाले की, लहान समाजाचे लोक ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये येणार आहेत त्यासाठी तुम्हाला बाकीचे सर्व सवलती सोडायच्या आहेत का? तुम्हाला राजकारणात भरपूर मिळालेले आहे आणि मिळणारच आहे. मुद्दा मुलांच्या शिक्षणाचा आणि नोकऱ्यांचा आहे. तो या गर्दीत जास्त मिळेल का वेगळ्या आरक्षणातून मिळेल असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. निकाल पाहिला तर ओबीसीचा कट ऑफ खूप वर आहे हे पाहिले पाहिजे.
सरकारवर दबाव आणला जातोय
छगन भुजबळ म्हणाले की, आंदोलन करत मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्या असा दबाव आणला जात आहे. 50 टक्के आरक्षणात जास्तीत जास्त मराठा समाज होता. त्यांना EWS, वेगळं 10 टक्के आरक्षण देण्यात आले. पण त्यांना ते नको आहे का? याचे उत्तर मला मराठा समाजाच्या शिकलेल्या नेतृत्वाने द्यायला हवे.
शिकलेल्या माणसांनी उत्तर द्यावे
छगन भुजबळ म्हणाले की, ज्या वेळी 50 टक्के आरक्षण होते आणि 50 टक्के ओपन होते त्यावेळी ब्राह्मण समाज किती 2 ते 3 टक्के आहे. आणखी दुसरे दोन चार पण जास्तीत जास्त मराठा समाज 50 टक्क्यामध्ये होता.परंतु तरीसुद्धा आंदोलन झाले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र ते हरियाणा पर्यत आर्थिक दृष्टीने,शैक्षणिक दृष्टीने मागास,सामाजिक दृष्टीने नाही अशा साठी 10 टक्के आरक्षण दिले. त्यांच्यामध्ये सुद्धा 80 टक्के मराठा समाजच होता. त्यानंतर सुद्धा मागणी झाली वेगळं आरक्षण पाहिजे. त्यानंतर केवळ मराठा समाजाला 10 टक्के वेगळं आरक्षण दिले गेलेले आहे. आता तरी सुद्धा मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्या यासाठी आंदोलन करत प्रेशर निर्माण केले जात आहे. मला त्यांना विचारायचे आहे की, तुम्हाला 10 टक्के मराठा आरक्षण नको का, ते रद्द करायचे का? ते रद्द झाले तर EWS मध्ये तुम्ही 80 ते 90 टक्के असतात ते तुम्हाला नकोच का? याचे उत्तर अनेक माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री राहिलेल्या लोकांनी द्यावे. माझा प्रश्न हा ज्यांचे शिक्षण झालेले नाही अशा नेत्यांसाठी नाही. माझा प्रश्न हा सुशिक्षित मराठे आहेत त्यांच्यासाठी आहे. जे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार झाले आहेत ज्यांना आरक्षण म्हणजे काय हे कळतंय त्यांच्यासाठी मी विनंती करतोय, असे म्हणत अप्रत्यक्ष मनोज जरांगे पाटील यांना टोला लगावला आहे.
कराड यांच्या कुटुंबीयांना भेटणार
छगन भुजबळ म्हणाले की, रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील एका ओबीसी समाजाच्या भरत कराड नावाच्या कार्यकर्त्यांने ओबीसीचे आरक्षण संपले असे सांगत आत्महत्या केली आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी मी जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.