
Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance: हिंदी भाषेचा शालेय अभ्यासक्रमामध्ये पहिल्या इयत्तेपासून समावेश करण्यासंदर्भातील दोन शासन आदेश रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सायंकाळी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वीसंध्येला केली. राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं हिंदीच्या सक्तीविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा दिलेला. 5 जुलै रोजी गिरगाव ते आझाद मैदान असा संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा मनसे आणि शिवसेनेनं केली होती. मात्र आता शासनाने हा वादग्रस्त आदेश मागे घेतल्याने हा मोर्चा होणार नाही असं राज ठाकरेंनी निर्णयानंतर आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टवरुन स्पष्ट झालं. मात्र असं असलं तरी शासनाच्या निर्णयानंतर आणखी एका पोस्टने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मोर्चा रद्द तरी 5 तारखेला एकत्र येणार ठाकरे?
उद्धव ठाकरे यांनी 5 जुलैचा मोर्चा रद्द झाला असला तरी जल्लोष केला जाणार सभा किंवा मेळावा घेतला जाणार त्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं अस आवाहन केलेल आहे. या जल्लोषासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. मुंबईतील मराठी शक्तीची एकजुट दाकवून देऊ या उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला मनसेकडून कसा प्रतिसाद द्यायचा याबाबतची रणनीती आज होत असलेल्या मनसेच्या बैठकीमध्ये ठरवली जाणार आहे. हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मनसेचे नेते, सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकारी राहणाऱ बैठकीसाठी उपस्थित आहेत. बाळा नांदगांवकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर यासारखे मनसेचे नेते बैठकीला हजर आहेत.
ती पोस्ट चर्चेत…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसंदर्भात वार्तांकन करणाऱ्या मनसे वृत्तांत अधिकृत या पेजवरुन एक पोस्ट करण्यात आली आहे. “5 जुलै, मराठी एकजुटीचा विजयोत्सव! ठाकरे,” अशा कॅप्शनसहीत एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. ‘मराठी = ठाकरे’ असा फॉर्म्युला या फोटोवर लिहिलेला असून फोटोच्या मध्यभागी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे. फोटोत डावीकडे उद्धव ठाकरे आणि उजवीकडे राज ठाकरेंचा फोटो आहे. ‘आम्ही येतोय, तुम्ही येताय ना?’ असा सवाल समर्थकांना विचारण्यात आला आहे.
ठाकरेंकडून मविआला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
एकीकडे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी 12 वाजता पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशीच विधान भवनात येणार आहेत. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे 12.45 वाजता आझाद मैदानात जनसुरक्षा विधेयकाविरोधातील मोर्चात सहभागी होणार आहेत. उद्धव ठाकरे दुपारी अडीच वाजता वाय बी चव्हाण सेंटर येथे जाणार आहेत. तिथून दुपारी तीन वाजता उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत एकाच गाडीतून सिल्वर ओक बंगल्यावर जाऊन आगामी स्थानिक निवडणुकांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. या भेटीतून महाविकास आघाडीला नवसंजीवनी देण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.