
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय गणित जुळवत मोठा डाव खेळला आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेमध्ये युती होणार असून, महापालिका आणि जिल्
.
या युतीची अधिकृत घोषणा बुधवारी (17 जुलै) दुपारी 1 वाजता मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर दोघेही उपस्थित राहून युतीचे औपचारिक रूपाने जाहीर करतील, अशी माहिती मिळत आहे. महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मराठी आणि दलित मतांच्या एकत्रीकरणासाठी रिपब्लिकन सेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिंदेंचा मतांच्या समीकरणावर भर
राज्यात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता शिवसेना शिंदे गटाने आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नागपूरसारख्या महत्त्वाच्या महानगरांमध्ये मराठी आणि दलित मतांची संख्या निर्णायक आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारगटांना सोबत घेण्यासाठी शिंदे गटाने ही युती साधल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेचा दलित समाजात विशिष्ट प्रभाव असून, त्यांचा पाठिंबा मिळाल्यास शिंदे गटाला निवडणुकीत निश्चितच फायदा होऊ शकतो. दुसरीकडे, आंबेडकरांनाही शिवसेनेच्या यंत्रणेचा आणि सत्ताधारी महायुतीच्या पाठबळाचा फायदा होण्याची शक्यता आहे.
महायुतीचा विस्तार
दरम्यान, शिंदे गट आणि रिपब्लिकन सेनेच्या युतीमुळे सत्ताधारी महायुतीचा सामाजिक आधार अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यातील महायुतीच्या पटलावर आता दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणारा एक घटक अधिक जोडला जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महायुती एक संघटित, व्यापक आघाडी म्हणून समोर येईल, असे म्हटले जात आहे.
हे ही वाचा…
उद्धव ठाकरे यांना विदर्भात मोठा धक्का:चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्षांची पक्षाला सोडचिठ्ठी, भाजपत जाण्याचे संकेत; चंद्रपूर बँकेवर भाजपचा अध्यक्ष
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सातत्याने धक्के बसत आहेत. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत सत्ताधारी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. त्यात आता चंद्रपूरच्या ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांची भर पडली आहे. चंद्रपूरचे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. पूर्ण बातमी वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



