
Anti Marathi Stand By Contractor: कल्याण ते तळोजादरम्यान मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु आहे. या कामदारम्यान वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून या ठिकाणी काही सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. हे सुरक्षारक्षक हरियाणामधील गवार कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी काम करत आहेत. या ठिकाणी मराठी भाषिक मुलंही मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या ठिकाणी सुरक्षारक्षकांना पगार देण्यात आलेला नाही. अखेर या प्रकरणामध्ये शिव जनरल कामगार सेनेचे सरचिटणीस हरीश इंगळे यांनी या ठिकाणा जाऊन थकित पगाराबद्दल जाब विचरला.
मराठी मुलांना कामावरुन काढा मग पगार देतो
इंगळे यांनी या ठिकाणी कार्यरत असलेल्या सुपरवायझऱला थकित पगाराविषयी विचारलं असता त्यांनी हरियाणामध्ये असलेल्या या या प्रोजेक्टसाठी व्यवस्थापकीय निर्देशक म्हणजेच एमडी म्हणून काम करत असलेल्या व्यक्तीला फोन लावून दिला. सुपरवायझरने फोन लावून दिल्यानंतर एमडीशी इंगळे यांनी संवाद साधला. त्यावेळी या एमडीने चक्क मराठी मुलांना कामावरुन काढून टाकल्यानंतर पगार देईल असे सांगितलं. हे विधान ऐकून हरीश इंगळेंना धक्काच बसला. हरीश इंगळेंनी हे संभाषण आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं. या प्रकरणामध्ये आपण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती हरीश इंगळेंनी दिली.
मराठी मुलांना आर्थिक व मानसिक त्रास
एकीकडे मराठीची अस्मिता त्याचबरोबर हिंदी सक्तीविरोधात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार असल्याने महाराष्ट्रात मराठी हा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे. मात्र मराठीच्या मुद्द्यावरुन अशाप्रकारे कामगारांचा पगार न देता त्यांना आर्थिक व मानसिक त्रास देत असल्याने समोर आले आहे. आता महाराष्ट्राच्या प्रकल्पामध्ये मराठी मुलांना कामावर ठेऊ नये अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Mumbai metro L12(Kalyan-Taloja)
1st pier cap placed at taloja next to operational Navi Mumbai metro L1
nk dadwal pic.twitter.com/NCMB468OT3— Sahil P (@Sahilinfra2) March 26, 2025
या आधीही असा त्रास
यापूर्वीही अशाप्रकारे मराठी मुलांना डावलण्यात आल्याचे प्रकार मुंबई आणि उपनगरीय शहरांमध्ये घडल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबईतील एका कंपनीने मराठी मुलांनी नोकरीसाठी अर्ज करु नये अशी अट घातली होती. याशिवाय मराठी माणसांना वेगवेगळ्या रहिवाशी संकुलांमध्येही अमराठी लोकांकडून त्रासाचा समाना करावा लागल्याचं पाहायला मिळालं आहे. मराठी लोकांवर वारंवार अशाप्रकारे अन्याय केला जात असतानाच आता थेट आर्थिक कोंडी करत मराठी मुलांना कामावरुन काढून टाकण्याचा कट थेट परराज्यातून केला जात असल्याचं या प्रकरणाच्या निमित्ताने समोर आलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.