digital products downloads

मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्या: मराठी राजभाषा गौरव दिन, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मागणी‎ – Amravati News

मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्या:  मराठी राजभाषा गौरव दिन, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मागणी‎ – Amravati News



मराठी राजभाषा गौरव दिना निमित्ताने डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया राज्य कमिटीच्या वतीने निवेदन देण्याचे ठरवले होते. त्याचाच एक भाग म्हणून डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने तहसीलदारांमार्फत शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना निवेदन पाठवले. महाराष्ट्र ही संतांची, समाज सुधारकांची व ज्ञान परंपरेची भूमी आहे. या भूमीत मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे, अस्मितेचा आणि सामाजिक प्रबोधनाचा आधारस्तंभ आहे. मात्र, अत्यंत खेदाने नमूद करावे लागते. की राज्यातील मराठी शाळांची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अलीकडेच विधानसभेत राज्यातील विविध भागातील २५५ मराठी सरकारी शाळा बंद करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. त्यामध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सात शाळांचा समावेश आहे. मागील पाच वर्षात पटसंख्येच्या कारणास्तव, विलीनीकरणाच्या नावाखाली तसेच नवीन संच मान्यता नियमावलीच्या अंमलबजावणीमुळे जवळपास १ हजार शाळा बंद झाल्याचा अहवाल आहे. ही केवळ आकडेवारी नसून शिक्षणाच्या हक्कावर झालेला झाला आहे.राज्यभर बंद करण्यात आलेल्या सर्व मराठी सरकारी शाळा पुन्हा सुरू करा, पटसंख्या व विलीनीकरणाच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा निर्णय तातडीने थांबवा, पहिली ते बारावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्याद्वारे सुनिश्चित करा, सरकारी शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण आधुनिक व दर्जेदार शिक्षणाची हमी द्या, सरकारी शाळांमधील शिक्षकांची सर्व रिक्त पदे तात्काळ भरा, ग्रामीण, आदिवासी व वंचित भागासाठी विशेष शैक्षणिक पायाभूत सुविधा व अनुदान उपलब्ध करून द्यावे. मराठी राजभाषा गौरव दिनी राज्यभर पहिल्या टप्प्यात निवेदन देण्यात येत आहे. परंतु, परिस्थितीत सकारात्मक बदल न झाल्यास राज्यभर तीव्र व व्यापक लोक आंदोलन उभारण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला निवेदन देतेवेळी जिल्हा सचिव साथी किशोर शिंदे शैलेश कटाने, राजगुरू शिंदे, आशिष रावेकर, राम शिंदे, मिलिंद चवरे, प्रवीण गावनर, शहेनशहा, आदित्य शिंदे उपस्थित होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp