
Manoj Jarange Maratha Morcha Mumbai Traffic Advisory: मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी मुंबईत जय्यत तयारी करण्यात येतेय. मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात आझाद मैदानात दाखल होत आहेत. मनोज जरांगे पाटील यांचा ताफा पहाटेच मुंबईच्या वेशीवर पोहोचला आहे. जवळपास साडेसहा हजार गाड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत. मराठा आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाल्यामुळं शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते. त्यासाठी मुंबई वाहतूक विभागाकडून पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यात यावा, असं अवाहन करण्यात येत आहे.
अशी असेल वाहतुकीची व्यवस्था
हे मार्ग बंद राहणार
– वाशीकडून येणाऱ्या साऊथ बॉण्डने पांजरपोळ-फ्री-वेकडे
– वीर जिजाबाई भोसले मार्गाकडून ट्रॉमवेकडे
– छेडानगरवरून फ्रीवेना जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी आहे
– व्ही. एन. पुरय मार्गावरून साऊथ बॉण्डने पांजरपोळ-फ्री-वेकडे
– देवनार फार्म रोड मार्गाकडून पांजरपोळकड़े ट्रॉम्बे चिता कॅम्पकडून व्ही. एन. पुरच मार्गावरून फ्री-वेला व पांजरपोळकडे जाणारा
– सायन पनवेल मार्गावरून पांजरपोळकडे येणारा
– सी. जी. गिडवाणी उत्तर वाहिनीवरून पांजरपोळकडे येणारा
– फ्री-वे उत्तर वाहिनीवरून पांजरपोळ जंक्शन येथे खाली उतरणारा
– आय. ओ. सी. जंक्शन आणि गोवंडी रेल्वे ब्रिजकडून फ्री-वेवर दक्षिण वाहिनीवर आणारा
– वामन तुकाराम पाटील मार्गावरून पांजरपोळ जंक्शन येथून फ्री-वे उत्तर वाहिनी मार्गिका
कोणते आहेत पर्यायी रस्ते?
– वाशीकडून येणाऱ्या सर्व वाहनांना साऊथ बॉण्डने मानखुर्द टी जंक्शन ब्रिज स्लीप रोडने उजवे वळण घेऊन वीर जिजाबाई भोसले मार्गाने आयओसी जंक्शन व छेडानगर मार्गे, तर घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडने ट्रॉम्बे व फ्रीयेला जाणारी सर्व प्रकारची वाहने छेडानगर मार्गाने, तसेच छेडानगरवरून फ्रीवेला जाणारी सर्व प्रकारची वाहने उजवे वळण घेऊन अमरमहल, नेहरूनगर ब्रिज, सुमननगर जंक्शन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागनि मुंबई शहरात प्रवेश करतील.
– व्ही. एन. पुरव मार्ग दक्षिण वाहिनीवरून पांजरपोळ व पूर्व मुक्त मार्गाकडे वेणाऱ्या सर्व वाहनांना पंजाबवाड़ी जंक्शन येथून उजवे वळण घेऊन हेमंत करकरे गॅस पंप येथून गोवंदी स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गाने पुढे गावदेवी चौकातून डावे वळण, नीलम जंक्शन उजवे वळण, पुढे मानखुर्द वाहतूक विभागाच्या हद्दीतून आय.ओ.सी. जंक्शन डावे वळण घेऊन पुढे मुंबई शहरात प्रवेश करतील.
– सी. जी. गिडवाणी उत्तर वाहिनीवरून पांजरपोळकडे येणारी सर्व वाहने गोल्फ क्लब येथून द्वावे वळण घेऊन चिमणी गार्डन येथून सरळ डायमंड गार्डन येथून उजवे वळण घेऊन सायन-ट्रॉम्बे मार्ग उत्तर वाहिनीवरून पुढे पांजरपोळ जंक्शन येथून डावे वळण घेऊन वामन तुकाराम पाटील मार्गाने पुढे मानखुर्द वाहतूक विभागाच्या हद्दीतून आय.ओ.सी. जंक्शन येथून उजवे वळण घेऊन घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडने नवी मुंबईकडे जातील,
– पूर्व मुक्त मार्ग उत्तर वाहिनीवरून पांजरपोळ टनेलनंतर सर्व प्रकारची वाहने पांजरपोळ फ्लायओव्हरवरून पुढे आय.ओ.सी. जंक्शन येथून उजवे वळण घेऊन नवी मुंबईकडे रवाना होतील. गोवंडी रेल्वे ब्रिज येथून खाली उतरून नीलम जंक्शन वेथे उजवे वळण घेऊन ना.ग. आचार्य मागनि पुढे सुभाषनगर, चेंबूर स्टेशन येथून मुंबईकडे अथवा इतरत्र जाता येईल.
– वामन तुकाराम पाटील मार्गावरून पूर्व मुक्त २ उत्तर वाहिनीकडे आणारी सर्व वाहने पांजरपोळ जंक्शन येथून उजवे वळण घेऊन मैत्रीपार्क सायन-ट्रॉम्बे रोडने मुंबईकडे जातील.
FAQ
1. मराठा आरक्षण रॅली कुठे आयोजित केली आहे?
रॅली मुंबईतील आझाद मैदानात आयोजित केली आहे.
2. रॅलीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा ताफा कधी मुंबईत पोहोचला?
मनोज जरांगे पाटील यांचा ताफा पहाटेच मुंबईच्या वेशीवर पोहोचला आहे.
3. रॅलीमुळे वाहतुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
मोठ्या संख्येने मराठा आंदोलक आणि साडेसहा हजार गाड्या मुंबईत दाखल झाल्याने शहरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.