
Sadabhau Khot : शेतकरी कुटुंबातील चळवळीतील कार्यकर्ते असलेले सदाभाऊ खोत एका मिश्कील वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. मला कुठं तरी राज्यपाल तरी करा, नाही तर आपली अवस्था बंद बॅडवाल्यासारखी होईल,अशा मिश्कील शब्दात आमदार सदाभाऊ खोत यांनी महायुती सरकारमधील होणारी घुसमट व्यक्त केली आहे. सांगलीच्या विटा येथे ते बोलत होते.
आमदार गोपीचंद पडळकर यांचा विटा येथे नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख हे खासदार आणि गोपीचंद पडळकर हे मंत्री होतील असे सांगत आपल्याला किमान राज्यपाल तरी करा अशी मिश्कील भावना व्यक्त केली. त्यामुळे व्यासपीठावर आणि सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.
‘मला कुठं तरी राज्यपाल तरी करा’
दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी संघर्ष जर कोणी केला असेल तर ते गोपीचंद पडळकर आहेत. गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोरनारा नाही तर मंगळसूत्राचं रक्षण करणारा आहे. कारण योद्धा रणांगणात हरत नसेल तर त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. आम्ही ज्यांना नेता म्हणलं ते आमचे देवाभाऊ गोपीचंद पडळकर यांना एक दिवस मंत्री केल्याशिवाय थांबणार नाहीत. तो पर्यंत कोणीही कितीही देव पाण्यात घालू द्या काही उपयोग होणार नाही. मी सुद्धा लोकसभेला निवडणुकीत उभा राहणार आहे. पण आम्हाला नेहमी एक भीती वाटते. ती म्हणजे अडनावाची.
पृथ्वीराज देशमुख हे आमदार होतील खासदार होतील. गोपीचंद पडळकर हे मंत्री होतील पण मला कुठं तरी राज्यपाल तरी करा. नाही तर आमंद बॅड वाल्यासारखं व्हायचं. बॅडवाल्याचं कसं असतं चांगलं गाणं वाजवायला लागलं की शेजारी असणारे सर्व म्हणतात की पुन्हा एकदा होऊन जाऊदे. तशी आमची अवस्था झाली आहे. सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यामुळे सर्वत्र हास्यकल्लोळ झाला.
सदाभाऊ खोत हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. ते रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष होते. शेतकऱ्यांच्या अडचणी आणि शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.