
Cidco Lottery 2025: मुंबई व मुंबईलगतच्या परिसरात घरांच्या किंमती वाढत चालल्या आहेत. घर घेणे खूप महाग होत चाललं आहे. मात्र सर्वसामान्यांना घर खरेदी करता यावे यासाठी सिडको आणि म्हाडाकडून लॉटरी काढण्यात येते. लॉटरीच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरात घरे खरेदी करता येऊ शकतात. घरांबाबतच अलीकडेच सिडकोने मोठी घोषणा केली आहे. दोन वर्षांत सिडको महामंडळ नवी मुंबईत तब्बल तीन हजार २५१ कोटी रुपयांचा खर्च गृहप्रकल्पांवर करणार आहे. अलीकडेच सिडकोने २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह गृहनिर्माण, नैना, मेट्रो, इंटरनॅशनल एज्युसिटी आणि पाणीपुरवठा योजना अशा विविध प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आलेली आहे.
अलीकडेच सिडकोने तयार केलेल्या 26 हजार घरांची लॉटरी काढलेली आहे. तर, आगामी काळात आणखी २५ हजार घरांचे बांधकाम सुरू आहे. सर्वांसाठी घरे या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत सिडकोचे सुमारे एक लाख घरे बांधण्याचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीने सिडकोने नियोजन करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे.
विविध कारणांमुळे सिडकोची जवळपास १२ हजार घरे विक्रीविना पडून आहेत. ती विकण्यासाठी गृहविक्री धोरणात बदल करण्याची चाचपणी सिडकोकडून केली जात आहे. नियमानुसार सध्या पती किंवा पत्नीच्या नावे नवी मुंबईत एक घर असेल तर दुसरे घर घेता येत नाही. मात्र, या नियमात बदल करण्याच्या हालचाली करण्यात येत आहेत. ही अट शिथिल करता येईल का, यादृष्टीने सिडकोचा संबंधित विभाग अभ्यास करीत असल्याचे समजते. ही प्रमुख अट शिथिल झाल्यास हजारो कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे.
मालमत्ता हस्तांतरण शुल्कात ५ ते १० टक्क्यांनी वाढ
सिडकोने नवी मुंबईतील मालमत्ता हस्तांतरण शुल्कात ५ ते १० टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा केली आहे. ही वाढ मालमत्तेच्या आकारमानानुसार आणि प्रकारानुसार लागू असेल. नव्या संरचनेनुसार, २० चौरस मीटरपर्यंतच्या निवासी मालमत्तांसाठी हस्तांतरण शुल्क २७,००० ते ७७,००० रुपये प्रति चौरस मीटर इतके असेल, तर २०० चौरस मीटरपेक्षा जास्त आकाराच्या मालमत्तांसाठी हे शुल्क १,११,१०० ते २,३१,००० रुपये प्रति चौरस मीटर इतके असेल. हे दर मालमत्तेच्या स्थानानुसार आणि प्रकारानुसार बदलतील.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.