
महसूल विभागाचे अधिकारी व व्यापाऱ्याने आदिवासींची जमीन बळकावून त्यातून तब्बल 160 कोटींची रक्कम उकळण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी ही बाब उजेडात आणली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत या संपूर्ण प्रकाराची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली आहे. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या माहितीनुसार, नंदूरबार जिल्ह्यात सध्या महामार्गासाठी भूसंपादन सुरू आहे. एका व्यापाऱ्याने नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील एका आदिवासी शेतकऱ्याची जमीन केवळ 40 लाख रुपयांत खरेदी केली. त्यानंतर त्याने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत साधून याच जमिनीच्या माध्यमातून 160 कोटी रुपये मिळवण्याचा प्रयत्न केला. उल्लेखनीय बाब म्हणजे आदिवासींची जमीन कोणत्याही प्रकारचे बक्षीसपत्र तयार करून हस्तांतरित करता येत नाही. पण त्यानंतरही या व्यापाऱ्याने हा प्रकार केला. भूसंपादन करताना सदर जमिनीचे मूल्यांकन केवळ 40 लाख रुपये एवढे करण्यात आले. त्यानंतर सदर व्यापाऱ्याने उपविभागीय अधिकाऱ्याशी संगनमत साधून 40 लाखांच्या या जमिनीसाटी 8 कोटी रुपयांचे अवार्ड करण्यात आले. त्याच्या अपिलात ते थेट 163 कोटी रुपये झाले. हे गौडबंगाल अत्यंत धक्कादायक आहे, असे आमदार चंद्रकांत रघुवंशी हा प्रकार लक्षवेधीद्वारे विधिमंडळात उपस्थित करताना म्हणाले. त्यांनी हा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला. महसूल मंत्र्यांनी केली एसआयटी चौकशीची मागणी दुसरीकडे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली. त्यांनी या प्रकरणाची तत्काळ एसआयटी चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार या प्रकरणात नाशिकचे महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. ही समिती या प्रकरणाची चौकशी करून एका महिन्याच्या आत आपला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर दोषी महसूल अधिकाऱ्यांवर कारवाईचे पाऊल उचलण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने झालेल्या या घोटाळ्याची माहिती मिळताच स्वतः बावनकुळेही आश्चर्यचकित झाले. या लक्षवेधीमुळे शासनाचा मोठा निधी वाचणार आहे. त्यामुळे हा प्रकार उजेडात आणल्याबद्दल त्यांनी आमदार रघुवंशी यांचे कौतुक केले. हे ही वाचा… महाराष्ट्रात गॅस सिलिंडरची गाडीच चोरीला:विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत माहिती; गॅस तुटवड्यावर स्थिती स्पष्ट करण्याची मागणी
इराण विरुद्ध इस्त्रायल – अमेरिका युद्धाच्या झळा अवघ्या जगाला बसत आहे. महाराष्ट्रात तर गॅस तुटवड्याची परिस्थिती दिवसागणिक हाताबाहेर जात आहे. त्यातच राज्यात गॅस सिलिंडरचा पुरवठा करणारी एक गाडीच चोरीला गेल्याची भयंकर घटना घडली आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेच्या पटलावर या घटनेचा उलगडा केल्यानंतर ही घटना समोर आली. मंत्रालयातील कॅन्टिनही बंद पडल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारकडे स्थिती स्पष्ट करण्यासाठी निवेदन करण्याची मागणी केली. त्यामुळे सरकारकडून या प्रकरणी आज एखादे निवेदन येण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



