
राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अद्यापही मिळाली नसल्याची ओरड होत असताना आता पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना 5 रुपये, 8 रुपये व 13 रुपयांची मदत करण्यात आल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टी
.
यंदा राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. विशेषतः मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील पीक-पाण्याचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतजमीनच खरडून गेल्यामुळे रब्बी हंगाम कसा घ्यायचा? हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 32 हजार कोटींचे पॅकेज घोषित केले. तसेच ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची ग्वाहीही दिली. पण दिवाळी संपून आठवडा होत आला तरी ही मदत शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचा आरोप होत आहे.
5 रुपयांत शेतकरी जगणार कसा?
त्यानंतर आता पीकविमा योजनेतही शेतकऱ्यांना 5-10 रुपयांची मदत करण्यात आल्याची संतापजनक बाब उजेडात आली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांवर अस्मानी संकट आले, शेतकऱ्यांना मदत मिळणे दूरच उलट प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची अहवेलना करण्यात आली आहे. अकोला येथील शेतकऱ्यांना 5 रुपये, 8 रुपये, 13 रुपये अशी मदत करण्यात आली आहे. याला जखमेवर तिखट चोळणे म्हणतात.
एकीकडे हातातील पीक केलं, जे आहे त्या शेतमालाला भाव मिळत नाही जे नुकसान झालं त्याचा विमा असा पाच रुपये मिळणार असेल तर शेतकरी जगणार कसा? शेतकऱ्यांना मदत सोडा पण त्यांचा असा अपमान करू नका, असे ते म्हणालेत.
नेमका काय आहे प्रकार?
अकोला जिल्ह्यातील कुटासा परिसरातील दिनोडा, मरोडा, कावसा व रेल या गावांतील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई म्हणून 5 ते 27 रुपयांची मदत जमा झाली आहे. अरुण राऊत या शेतकऱ्याच्या खात्यावर 5 रुपये 8 पैसे, संदीप घुगे यांना 5 रुपये, गणपत सांगळे यांना 13 रुपये, विजय केंद्रे याना 14 रुपये 7 पैसे, केशव केंद्रे यांना 16 रुपये 15 पैसे, आदित्य मुरकुटे यांना 21 रुपये 85 पैसे व उमेश कराड यांच्या खात्यावर 27 रुपये 5 पैसे जमा झालेत.
तुटपुंजी रक्कम मिळालेले हे शेतकरी प्रातिनिधिक आहेत. याशिवायही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अशीच तुटपुंजी रक्कम जमा झाली आहे. या संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी काँग्रेस प्रवक्ते कपिल ढोके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही मदत सरकारला परत केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



