
Report Card Of Mahayuti: राज्यातील महायुती सरकारचे रिपोर्ट कार्ड जाहीर करण्यात आले आहे. आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 100 दिवसांचे रिपोर्ट कार्ड जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन कोणत्या विभागाला आणि मंत्रालयाला किती गुण मिळाले याची यादीच पोस्ट केली आहे. राज्यातील 1000 दिवसांचे रिपोर्ट कार्ड कसं आहे? जाणून घेऊया.
देवेंद्र फडणवीसांनी काय ट्विट केलंय?
राज्यात नवीन महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाच्या सर्व 48 विभागांनी 100 दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली. एकूण 48 विभागांपैकी 12 विभागांनी आपली 100% उद्दिष्ट पूर्तता केली आहे तर आणखी 18 विभागांनी 80% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत.
राज्यात नवीन महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाच्या सर्व 48 विभागांनी 100 दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली.
गेल्या 100 दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या 902 धोरणात्मक… pic.twitter.com/8IfRVry1jb
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 1, 2025
कोणत्या विभागाचा पहिला नंबर?
आदिती तटकरे यांच्या महिला आणि बालविकास विभागाला 80 गुण मिळाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला दुसरा क्रमांक मिळाला असून मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कृषी विभागाला तिस-या क्रमांक तर चौथ्या क्रमांकावर ग्रामविकास विभाग आहे.
– महिला व बाल विकास -80%
– सार्वजनिक बांधकाम विभाग 77.95%
– कृषी विभाग 66.15%
– ग्राम विकास विभाग 63.85%
– परिवहन व बंदरे विभाग 61.28%
सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त
– महानगरपालिका आयुक्त, उल्हासनगर- 86.29
– महानगरपालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड-85.71
– महानगरपालिका आयुक्त, पनवेल- 79.43
– महानगरपालिका आयुक्त, नवी मुंबई- 79.43
सर्वोत्तम पोलीस आयुक्त
– पोलीस आयुक्त, मीरा भाईंदर- 84.57
– पोलीस आयुक्त, ठाणे-76.57
– सर्वोत्तम पोलीस आयुक्त, मुंबई रेल्वे-73.14
सर्वोत्तम विभागीय आयुक्त
– विभागीय आयुक्त, कोकण-75.43
– विभागीय आयुक्त,नाशिक-62.29
– विभागीय आयुक्त, नागपूर-62.29
सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक/उपनिरीक्षक
– पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक, कोकण- 78.86
– पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक, नांदेड-61.14
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.