
CM Devendra Fadanvis On Mahayuti 100 Days: महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या महायुती सरकारने आपले 100 दिवस पूर्ण केले आहेत. या 100 दिवसांमध्ये महायुती सरकारने काय केलं? असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जातो. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. महायुतीच्या सुरुवातीच्या 100 दिवसांबद्दल काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? सविस्तर जाणून घेऊया.
वक्फ सुधारणा बील मांडण्यात आलेलं असून हे बील पास होईल.याने भारतीय संविधानात सेक्युलर शब्दाचे पालन होणार आहे. नव्या बिलाने चुका सुधारण्याची संधी दिली आहे. यात महिलांना देखील प्रतिनिधित्व मिळालं असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हे अतिशय पुरोगामी असे पाऊल उचलण्यात आलंय. कुठल्याही धार्मिक आस्थांविरोधात हे बील नाही. काही चुकांचा फायदा घेत होते आणि जमीनी लाटत होते. सदसदविवेकबुद्धी जागृत असलेला विरोध करणार नाही. यामुळे विरोधक जेपीसीमध्ये निरुत्तर झाल्याचेही ते म्हणाले. सुधारणा राज्यांना विचारात घेऊन करण्यात आलेल्या आहेत. जेव्हा असं वाटतं विरोधकांनी छातीवर हात ठेवत निर्णय केला तर त्यांचा पाठिंबाच असेल. मात्र मतांच्या लांगूलचालनासाठी विरोधक हे करत आहेत. कोर्टात जाण्याची देखील मुभा यात नव्हती. मतांचे तळवे चाटण्याचे हे विरोधकांचे राजकारण आहे. त्यांची सतसत विवेकबुद्धी जिवंत असेल, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालण्याची अजूनही इच्छा असेल तर ते समर्थन देतील, असेही ते पुढे म्हणाले.
महायुतीच्या 100 दिवसात काय काम केलं?
महायुती सरकारने पहिल्या 100 दिवसात काय काम केलं? याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलीय. 938 मुद्द्यांवर काम करायचं होतं. यापैकी 411 मुद्द्यांवरील काम पूर्ण झालंय. म्हणजेच 44 टक्के काम पूर्ण झालंय. 272 मुद्द्यांवर काम अर्ध झालंय. 116 मुद्द्यांवर काम अजून बाकी आहे. म्हणजे 16 टक्के काम अपूर्ण असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 1 मे पर्यंत 16 टक्के काम पूर्ण झालं पाहिजे असं विभागांना सांगितलं आहे. यासाठी 2 आठवड्यांचा वेळ विभागांना अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी दिलाय. 100 दिवसांचा काय प्लान केला होता, काय नाही झालं हे देखील विभागांना प्रकाशित करायचं आहे. म्हणजे माध्यमांपर्यंत ते देखील पोहोचेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 22 विभागांचा आढावा उद्या घेतला जाणार आहे.क्वालिटी काऊन्सिलिंग अथोरिटीला आम्ही काम दिलंय. त्यांच्याद्वारे कामाच्या गुणवत्तेचा आढावा होईल नंतर आमच्याकडे येईल त्यामुळे त्याच्या तपासणीचे काम आम्ही लगेच नाही करत. ते नंतर आमच्याकडे आल्यावर करु असेही त्यांनी सांगितले.
काकांना आशीर्वादासाठी मर्यादीत त्यांनी ठेवलं आहे. हे तुम्हाला कोणालाच लक्षात आलेलं नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं.बीडमध्ये आता काय? तुमच्याकडे बातम्या उरलेल्या नाही त्यामुळे तुम्ही चालवत असता.सीआयडीनं विश्लेषण केलं आणि चार्जशीट द्वारे कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी संतोष देशमुख हत्येसंदर्भात बोलताना सांगितले. सरकारची भूमिका स्पष्ट आग्रह चुकीचा नाही मात्र कायदा हातात घेतला तर कायदेशीर कारवाई होईलच, असे ते यावेळी मराठी भाषेबद्दल मनसेने घेतलेल्या भूमिकेवर बोलताना म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.