
DCM Ajit Pawar : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Assembly Budget Session) पहिल्या दिवसापासून अनेक मुद्दे गाजले आणि आता हे अधिवेश सांगतेच्या दिशेनं जात असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्षवेधी वक्तव्य केलं. विधानभवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काही गोष्टींवर स्पष्ट मत मांडलं. किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी शेजारी असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकावी अशी मागणी, माजी खासदार संभाजीराजे यांनी केली असतानचा यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
समाधी, रायगड आणि महाराज…
‘मला एक कळत नाही. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून 1680 ला गेले. आता हा सगळा काळ 80 ला महाराज गेल्यानंतर आता आपण 2025 मध्ये आहोत. का असे जुने मुद्दे काढले जातायत? ही समाधी आज आहे का? यावर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश चव्हाण साहेबांनी आणला. चव्हाण साहेबांपासून आताच्या देवेंद्रजींपर्यंत वेगवेगळ्या मान्यवरांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं. अनेक पंतप्रधान रायगडला येऊन गेले, राष्ट्रपती येऊन गेले, वेगवेगळे राजकीय नेते येऊन गेले.
आता मध्ये कोणते ना कोणते मुद्दे काढले जातात. मुद्दा मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण माझं मत असं आहे’, असं म्हणताना लोकहिताच्या आणि व्यापक मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवावं असं ठाम मत अजित पवार यांनी मांडलं.
आज आपल्या जगाच्या, देशाच्या राज्याच्या समोर AI चा प्रश्न आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, बटेजमध्येही मी याविषयी बोललो असं म्हणताना उपमुख्यमंत्र्यांनी AI चा शेतीपासून दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम अधिक प्रकर्षानं मांडला. अशा स्थितीमध्ये एखादं नवं वक्तव्य केलं जातं आणि तिथंच ही चर्चा सुरू होते. वास्तविक या चर्चांपेक्षा तरुण तरुणींना उद्योग देणं, रोजगार देणं हे महत्त्वाचे मुद्दे आहेत ही बाब त्यांनी अधोरेखित केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.