
सांगलीतील तरुण कंत्राटदार याला सरकारने जलजीवन मिशन योजनांच्या कामांचे पैसे न दिल्यामुळे आत्महत्या केली. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर धारेवर धरलं आहे. संजय राऊत यांनी थेट सरकारवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
पोस्टमध्ये संजय राऊत यांनी काय म्हटले?
हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर संजय राऊत यांनी एक पोस्ट केली. त्यात म्हणाले की, सरकार अमानुष निर्दय आहे. स्वतःच्या मोठेपणाचे ढोल वाजवण्यासाठी भाडोत्री भाट ठेवले आहेत. हर्षल पाटीलची आत्महत्या ही मराठी तरुणांची अगतिकता आहे. सरकारने केलेला हा सदोष मनुष्य वध आहे. हायकोर्टाने स्यू मोटो दखल घेऊन खालील तिघांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करायला हवा.’ या पोस्टसोबत एक फोटोही शेअर करण्यात आला आहे. यावर फडणवीस, शिंदे, अजित पवार यांचा फोटो असून हर्षल पाटील ही आत्महत्या नसून सरकारने केलेली हत्याच आहे, असं अखोरेखित केलंय.
सरकार अमानुष निर्दय आहे,
स्वतःच्या मोठेपणाचे ढोल वाजवण्यासाठी भाडोत्री भाट ठेवले आहेत
हर्षल पाटील ची आत्महत्यां ही मराठी तरुणांची अगतिकता आहे.
सरकारने केलेला हा सदोष मनुष्य वध आहे
हाय कोर्टाने स्यू मोटो दखल घेऊन खालील तिघांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करायला हवा
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/Qw3ZjRm3M5— Sanjay Raut (@rautsanjay61) July 24, 2025
‘महाराष्ट्राचं स्मशान केलं..’
हर्षल पाटीलची आत्महत्या नसून सरकारनेच खून केला आहे, असा आरोपही राऊतांनी केला. त्याला आत्महत्या का करावी लागली, जलजीवन मिशनच्या कामाचे पैसे त्याला वेळेवर का मिळू शकले नाहीत, त्याला कोण जबाबदार, कोणते मंत्री, कोणते अधिकारी जबाबदार आहेत ? अशा प्रश्नांच्या फैरी झाडत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणारा का असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. त्याला द्यायला सरकारकडे 1 कोटी 40 लाख नाहीत का ? ठेकेदारांची 80 हजार कोटींची बिलं थकली आहेत, अनेक ठेकदारांनी आत्महत्या केल्या, काहींनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आणि काल हर्षल पाटील या तरूणाने आत्महत्या केली. तरीसुद्धा सरकारमधले हे 2-3 लोकं नरेंद्र मोदींप्रमाणे मौज-मजा करत फिरत आहेत अशी बोचरी टीका राऊतांनी केली.
पंतप्रधानांनी परवा फडणवीसांचं खूप कौतुक केलं, त्याच पंतप्रधानांनी दोन दिवस महाराष्ट्रात येऊन रहावं आणि गेल्या 5 महिन्यात शेतकरी आणि तरूण उद्योजकांच्या ज्या आत्महत्या झाल्या त्यांच्या कुटुंबियांना बोलवावं. फडणवीस आणि त्यांच्या दोन डेप्युटींनी या राज्याचं कसं स्मशान केलं आहे ते समजून घ्यावं अशी घणाघाती टीका राऊतांनी केली.
मुख्यमंत्र्यांचा परवा वाढदिवसाच्या दिवशी गडचिरोलीमध्ये गेले आणि तिथून म्हणाले की शहरामध्ये नक्षलवाद वाढला आहे. अहो तुमच्या पक्षामध्ये आणि सरकारमध्ये नक्षलवाद आहे. नक्षलवाद म्हणजे हिंसाचार असेल तर तुमचे लोक हिंसाचार करत आहेत. काल दौंडमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या भावाने एका नर्तिकेवर गोळ्या झाडल्या, ही हिंमत येते कुठून असा सवाल राऊतांनी विचारला. हा नक्षलवादच आहे ना. खुलेआम मारामाऱ्या होत आहेत, सरकारचे लोक एकमेकांवर हल्ले करत आहेत, हा नक्षलवादच आहे ना. आधी तुमच्या सरकारमधील नक्षलवाद, हनी ट्रॅप हा सुद्धा नक्षलवादच आहे, हाही एक प्रकारचा नाजूक दहशतवाद आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.