
Tahawwur Rana: मराठमोळे अधिकारी सदानंद दाते 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाची चौकशी करणार आहेत. 26/11च्या हल्ल्याच्या वेळी सदानंद दाते हे मुंबईत तैनात होते. या हल्ल्यावेळी त्यांनी अजमल कसाब आणि त्याच्या साथिदारांशी दोन हात केले होते.
मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळी दाते यांनी अतुलनीय शौर्य दाखवलं होतं. या कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने देखील गौरवण्यात आलं होतं. मात्र, तहव्वूर राणाला आता भारतात आणल्यानंतर सदानंद दाते त्याची चौकशी करणार आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या चौकशीतून कोणते मोठे उलगडे होण्याची शक्यता आहे.
कोण आहेत सदानंद दाते?
सदानंद दाते हे 1990 बॅचचे महाराष्ट्र केडरचे सीनियर आयपीएस अधिकारी आहेत. सदानंद दाते महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख आहेत. सदानंद दाते यांनी केंद्रीय अन्वेषण ब्युरो आणि केंद्रीय राखीव पोलीस दलातही काम केले आहे. मीरा-भाईंदर आणि वसई-विरारच्या पोलीस आयुक्तपदाचाही कार्यभारही त्यांनी सांभाळला आहे.
26/11 हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आल्यानंतर NIAनं त्याला अटक केलीय.. वैद्यकीय चाचणीनंतर राणाची चौकशी केली जाणारय.. त्यामुळे या चौकशीमधून कोणती मोठी माहिती हाती लागणार हे पहावं लागणार आहे.
मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणलं आहे. भारतात आल्यानंतर तहव्वूर राणाचा ताबा एनआयएनं घेतला आहे. तहव्वूर राणाच्या वैद्यकीय चाचणीनंतर त्याला पटियाला हाऊस कोर्टात हजर केलं जाणार आहे.
कोण आहे तहव्वूर राणा?
मुंबईतील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार
मास्टरमाईंड डेव्हिड हेडलीचा जुना मित्र
तहव्वूरचा जन्म पाकिस्तानातील
पाकिस्तानी लष्कराच्या वैद्यकीय विभागात काही काळ काम
1997मध्ये तो कुटुंबासह कॅनडात स्थायिक झाला
शिकागोत इमिग्रेशन आणि ट्रॅव्हल एजन्सी उघडली
2006 ते 2008 दरम्यान हेडली अनेकदा रेकीसाठी मुंबईत आला
हेडलीच्या प्रवासाबाबत शंका येऊ नये म्हणून राणाने मुंबईत ट्रॅव्हल एजन्सीचं ऑफिस उघडलं
मुंबई हल्ल्यात 6 अमेरिकन नागरिकांचाही मृत्यू झाला होता
2009 अमेरिकन तपास यंत्रणांनी दोघांना ताब्यात घेतलं होतं
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.