
Jitendra Awhad Vs Gopichand Padalkar Mid Night Protest: विधानभवनाचं यंदाचं पावसाळी अधिवेशन हे कैक मुद्द्यांवरून गाजलं. मुख्यत्वे नेत्यांमधील मतभेदांनी या अधिवेशनाला वादाची किनार दिली आणि त्याचं शिखर गाठलं ते म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील शाब्दिक बाचाबाची आणि त्यानंतर कार्यकर्त्यांणध्ये झालेल्या हाणामारीने.
दिवसभराचं कामकाज सत्र संपल्यानंतरही विधानभवनामध्ये मध्यरात्रीनंतरपर्यंत अटक नाट्यावरुन राडा झाला आणि हा सर्व प्रकार पाहता महाराष्ट्राच्या राजकारणा मिळालेलं हे वळण निंदनीय असल्याचीच प्रतिक्रिया काही नेत्यांनी दिली. यामध्ये शिवसेनेच्या UBT पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून सदर प्रकरणावर जळजळीत शब्दांत टीका केली. अपयशी सरकार, अपयशी गृहमंत्री म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं.
वाह क्या सीन है..
सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने दिवसाढवळ्या सार्वजनिक ठिकाणी गुंडागर्दी करणाऱ्यांवर कारवाई झाली असती तर आजची नामुष्की टळली असती..!
देवेंद्रजी,सुसंस्कृत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ऱ्हास पावली यावर तुमच्या आशीर्वादाने शिक्कामोर्तब झाले.@Dev_Fadnavis #लज्जास्पद pic.twitter.com/iLgmHx11tW— SushmaTai Andhare (@andharesushama) July 17, 2025
अंधांरे नेमकं काय म्हणाल्या? वाचा जसंच्या तसं…
”वाह क्या सीन है….?
ज्या विधिमंडळाने प्रचंड अभ्यासू आणि सुसंस्कृत नेत्यांची भाषणे ऐकली… त्या विधिमंडळाचा प्रवास आज गुंडागर्दीपर्यंत येऊन पोहचला…हे दुर्दैवी आहे…!!
सभागृहातले सदस्य मते मांडत असताना शंभूराजे देसाईने आई बहिणी वरून शिव्या घालण्याचा प्रसंग असेल किंवा भाजपच्या बायकांनी पायाला 56 बांधण्याची अश्लील भाषा इथ पासून सुरू झालेला प्रवास आज विधिमंडळाच्या प्रांगणात तुंबळ हाणामारी पर्यंत येऊन पोहोचला.
विशेष यावर पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन चा मुद्दा म्हणून बोलताना सभागृह अध्यक्ष नार्वेकर ज्या सहजपणे अहवाल मागवला आहे, बघूया , चला , पुढचं कामकाज बघा.. !! अशी प्रतिक्रिया देत होते. त्यावरून भाजपाला विधिमंडळाची मानमर्यादा धुळीला मिळत आहे याचे कसलेही वैषम्य वाटत नाहीय.
गल्लीबोळातली भांडण आणि गुंडगिरी करणाऱ्यांवर कार्यवाही करताना हा सत्ताधारी की विरोधक असा विचार करून सावध पावले उचलणारे गृह खाते याचा परिणाम म्हणून आम्ही सत्तेत असल्यावर आमचं कोणीच काही करू शकत नाही हा अविर्भाव वाढत आहे. ज्याची परिणिती आज सभागृहात दिसली.
अपयशी गृहमंत्री. अपयशी सरकार. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती रसातळाला गेली यावर विधिमंडळातल्या हाणामारीने आज शिक्कामोर्तब केले. देवेंद्रजी, विधिमंडळाच्या प्रांगणातही आपण कायदे सुव्यवस्था राखू शकत नाही.
टिप: आज अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या कायदे सुव्यवस्था या विषयावर चर्चा होणार होती म्हणे… भयंकर विनोद आहे.”
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.