
Maratha Reservation Manoj Jarange Patil Morcha : मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक मुंबईत दाखल झालेत. लाखोंच्या संख्येनं मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत धडकल आहे. यावरूनच ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी गंभीर आरोप केला आहे. जरांगेंच्या आंदोलनाआडून सरकार पाडण्याचा डाव आहे, असा आरोप हाकेंनी केला आहे. यात अजित पवारांचे आमदार-खासदारही सहभागी असल्याचा आरोप हाकेंनी केला. जरांगेंच्या नेतृत्वात पुन्हा एकदा मराठा समाज एकवटलाय. त्यातच आता हाकेंनी जरांगेंवर गंभीर आरोप केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. यावर आता सत्ताधारी पक्षाकडून प्रतिक्रिया आली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांनी सरकार उलथवून लावण्याची धमकी दिली होती. मराठा आरक्षण न दिल्यास राज्यातील सरकार घालवू असा थेट इशारा जरांगेंनी दिला होता. जरांगेंच्या या वक्तव्याचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी चांगलाच समाचार घेतला होता. मनोज जरांगे आरक्षणाच्या मुद्यावर ठाम आहेत.आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही या आक्रमक भूमिकेसह जरांगे मुंबईत पोहोचलेत. त्यातच हाकेंनी जरांगेंसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर आरोप केलेत. त्यामुळे यावर आता काय प्रतिक्रिया येतात, हे पाहावं लागणार आहे.
मनोज जरांगेंच्या आंदोलनात नियम पाळले जात नसतील तर कारवाई करा. जरांगेंच्या आंदोनात सर्व झुंडशाही करणारे आंदोलक असल्याचा आरोप, OBC नेते नवनाथ वाघमारे यांनी केला. OBCतील राजकीय आरक्षण लाटण्याचा त्यांचा राजकिय कट असल्याचा आरोपही वाघमारेंनी केला. मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाचा धसका सत्ताधारी भाजप आमदारांनीही घेतल्याचं पाहायला मिळतंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि भाजपचे पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी मनोज जरांगेंच्या मागणीनुसार आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी आमदार अवताडे यांनी विधानसभेचं एक दिवसाचं अधिवेशन घेण्याची लेखी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना केली आहे. यामुळे भाजपचे आमदारही जरांगेंसोबत असल्याचं चित्र दिसून येतंय. तर मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारनं तातडीनं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अभिजित पाटील यांनी केली आहे. बहुजन समाजाला सर्वात पहिले 50 टक्के आरक्षण माझे पंजोबा राजर्षी शाहू महाराजांनी दिलं होतं. असं विधान संभाजीराजे छत्रपती यांनी केलंय.. तसंच गरिब मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे, जरांगे आणि सरकारने यावर एकत्र बसून तोडगा काढावा, असंही संभाजीराजे म्हणाले.
FAQ
1. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा कशासाठी आहे?
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा मोर्चा हा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून 10 टक्के आरक्षण मिळावे, यासाठी आहे. त्यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे.
2. मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्या प्रकारची आंदोलने केली आहेत?
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलने केली आहेत, ज्यात उपोषणे, रास्ता रोको, आणि मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाचा समावेश आहे. त्यांनी 2025 मध्ये पुन्हा मुंबईत मोठा मोर्चा काढला, ज्यामध्ये लाखो मराठा समाजाचे लोक सहभागी झाले.
3. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी कोणते आरोप केले आहेत?
लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे सरकार पाडण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी असा दावा केला की, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार-खासदारांचा यात सहभाग आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.