
Shivsena And MNS: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरु आहे.. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे सूर जुळण्याआधी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं.
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूच्या युतीची जोरदार चर्चा आहे.. राज ठाकरेंनी एकत्र येण्यासाठी साद घातल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिला. तेव्हापासूनच आगामी निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा रंगली. मात्र त्यानंतर युतीबाबत दोन्ही बाजूंनी टोलवाटोलवी सुरु झाली. त्यामुळे ठाकरे बंधूंचं मनोमिलन कधी होणार असा प्रश्न सा-यांनाच पडला. ठाकरे बंधू एकत्र आले नसले तरी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळालं.
गेल्या 7 वर्षांपासून डोंबिवलीच्या कटाई नाका इथल्या पलावा पुलाचं काम रखडलंय. त्यामुळे या परिसरात वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. त्याच पार्श्वभूमीवर या पुलासाठी 31 मेची डेडलाईन देण्यात आली होती. मात्र डेडलाईन देऊनही पूल सुरु न झाल्यानं शिवसेना UBT आणि मनसेनं एकत्र येऊन आंदोलन केलं.यावेळी शिवसेना-मनसेचा विजय असो अशा घोषणा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.
या आंदोलनामुळे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा रंगलीय.यासाठी दोन्ही पक्षाचे नेते कार्यकर्तेही आशावादी असल्याचं समोर आलंय. तर तिकडे सत्ताधा-यांनी मात्र या आंदोलनावर खोचक प्रतिक्रिया दिलीय. त्यामुळे डोंबिवलीतील युतीच्या पुलानंतर आता ठाकरे बंधूंचेही सूर जुळणार का? आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार का? याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
‘ठाकरे आणि पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय पण…’,
राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष युतीसोबत जाणार की महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार याबद्दल संभ्रम कायम आहे. असं असतानाच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ‘ठाकरे’ आणि ‘पवार’ कुटुंबासंदर्भात मोठं विधान केलं आहे. राज ठाकरेंनी ‘मुंबई तक’ला विशेष मुलाखत दिली. राज यांना ‘ठाकरे’ आणि ‘पवार’ ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे का असा सवाल विचारण्यात आला. पत्रकार साहिल जोशी यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेताना, “महाराष्ट्राच्या राजकारणात दोन नावं प्राकर्षाने घेतली जातात, ठाकरे आणि पावर! मात्र सध्यस्थितीमध्ये ठाकरे-पवार हे दोन्ही ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय का?” असा थेट प्रश्न विचारला. मागील काही वर्षांमध्ये राज्यातील नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांची युती तसेच आघाडी या पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारण्यात आलेला. राज यांनी या प्रश्नाला होकार्थी उत्तर दिलं. “संपवण्याचा प्रयत्न चालला आहे यात काही वाद नाही. निश्चितच,” असं राज ठाकरे प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. मात्र पुढे बोलताना राज ठाकरेंनी, “पण तो संपणार नाही. मी हे लिहून घ्यायला तयार आहे. तो संपणार नाही,” असं आत्मविश्वासाने सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून राज यांच्या उत्तराला प्रतिसाद दिला. “या सगळ्यामध्ये आमचे आजोबा येतात. महाराष्ट्रावर पहिला परिणाम जर म्हटला तर प्रबोधनकार ठाकरे. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांच्या बरोबरीने तुम्ही संगीत क्षेच्रात किंवा इतर क्षेत्रात पाहिलं तर माझे वडील श्रीकांत ठाकरे. त्यानंतर माझा (क्रमांक लागतो.) मी येतो, उद्धव येतो. प्रश्न अशा आहे की या साऱ्यामध्ये व्यक्ती येतातच पण आडनवा असतं. मला असं वाटतं की अडनाव हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे,” असं राज ठाकरे त्यांच्या कुटुंबातील प्रभावी व्यक्तींसंदर्भात आणि अडनावाच्या प्रभावाबद्दल म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.