digital products downloads

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात हायव्होल्टेज निवडणुकीचा निकाल जाहीर! अजित पवारांनी चॅलेंज देऊन निवडणूक जिंकली

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात हायव्होल्टेज निवडणुकीचा निकाल जाहीर! अजित पवारांनी चॅलेंज देऊन निवडणूक जिंकली

Malegaon Sugar Factory Election Result : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात हायव्होल्टेज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.  बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निकालामध्ये काय होणार याची उत्सुकता सर्वांना होती. अखेर 21 पैकी 20 जागा अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलला मिळाल्यात.. तर तावरे गटाला केवळ एक जागा जिंकता आलीये. या निवडणुकीत शरद पवार यांच्या पॅनलला एकही जागा मिळवता आली नाही.. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी बारामतीत गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केलाय. 

बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनलनं एकहाती वर्चस्व प्रस्थापित केलंय. अतिशय प्रतिष्ठेच्या अशा माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपचे रंजन तावरे आणि अजित पवार असा सामना झाला. शरद पवारांचं बळीराजा पॅनल आणि अपक्षांचं एक पॅनल असे इतरही दोन पॅनल रिंगणात होते. महायुती सरकारमध्ये एकत्र असलेल्या मित्रपक्षांची ही लढत अतिशय चुरशीची होणार असं वाटलं होतं.. अजित पवारांनी स्वतः प्रचारासाठी बारामतीत तळ ठोकला होता. प्रत्यक्षात अजित पवारांच्या डावपेचांपुढं रंजन तावरेंसह सगळेच सपशेल फेल ठरले. निकाल जाहीर होताच गुलालाची उधळण झाली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुस-यांदा अजितदादांनी विजयाची गुलाल उधळलाय.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेची लढाई म्हणून पाहिल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला   निकाल बुधवारी जाहीर झाला. या निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी सुरुवात झाली होती. मंगळवारी फक्त पहिल्या फेरीची मतमोजणी पार पडू शकली. त्यानंतर बुधवारी सकाळी साडेपाच वाजल्यापासून पुन्हा एकदा मतमोजणीला सुरुवात झाली. आज सकाळपासून सुरु असलेल्या मतमोजणीच्या कलांनुसार माळेगाव साखर कारखान्यावर पुन्हा एकदा अजित पवार यांच्याच निलकंठेश्वर पॅनेलची सत्ता आली आहे. 

फक्त दोन जागा वगळता इतर कोणत्याही जागेवर अजित पवारांच्या पॅनेलसमोर विरोधी उमेदवारांचा निभाव लागू शकला नाही. एवढेच नव्हे तर अजित पवार यांच्या निलकंठेश्वर पॅनेलसमोरील मुख्य प्रतिस्पर्धी असणाऱ्या सहकार बचाव पॅनेलचे प्रमुख रंजन तावरे हेदेखील पराभूत झाले आहेत. या निवडणुकीत त्यांचा 362 मतांनी पराभव झाला आहे. रंजन तावरे यांनी सहकार बचाव पॅनेलचे नेृतृत्त्व केले होते. माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडले होते. या निवडणुकीसाठी अजित पवारांचे निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बळीराजा सहकार बचाव पॅनेल, भाजप नेते चंद्रराव तावरे- रंजन तावरे यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनेल आणि कष्टकरी शेतकरी समिती, अपक्षांचे एक पॅनेल, अशी चार पॅनेल  रिंगणात होती.

ब वर्ग प्रतिनिधी

अजित पवार यांना मिळालेली मते (श्री निळकंठेश्वर पॅनल) 91

भालचंद्र देवकाते यांना मिळालेली मते (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 10

 यात अजित पवार 91 मतांनी विजयी 

 

अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ

रतनकुमार साहेबराव भोसले(श्री निळकंठेश्वर पॅनल) 8670  

बापूराव आप्पा गायकवाड (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 7183 

 यात 1487 मताने रतनकुमार भोसले विजयी

 

 इतर मागासवर्गीय प्रवर्ग 

नितीन वामनराव शेंडे (श्री निळकंठेश्वर पॅनल)  8494 मते

रामचंद्र कोंडीबा नाळे (सहकार बचाव पॅनल) 7341

 यात 1153 मतानी नितीन शेंडे विजयी. 

 भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग

विलास ऋषिकांत देवकाते(श्री निळकंठेश्वर पॅनल)

सूर्याजी तात्यासो देवकाते (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 

 यात 2227 मतांनी विलास देवकाते विजयी

 महिला राखीव मतदारसंघ 

संगीता बाळासाहेब कोकरे(श्री निळकंठेश्वर पॅनल) 8440 
ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले(श्री निळकंठेश्वर पॅनल) 7576 
( अजित पवार गटाच्या या दोघीही महिला विजयी)

राजश्री बापूराव कोकरे(सहकार बचाव शेतकरी पॅनल) 7485 (अवघ्या 91 मतांनी राजश्री कोकरे यांचा पराभव)

माळेगाव गट क्रमांक एक सर्वसाधारण ऊस उत्पादक 

शिवराज जाधवराव (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8612
बाळासाहेब तावरे (श्री निळकंठेश्वर पॅनल)7942
राजेंद्र बुरुंगले ( श्री निळकंठेश्वर पॅनल) 8116
(वरील तीनही उमेदवार विजयी आहेत)

रंजनकुमार शंकरराव तावरे (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 7353
संग्रामसिंह काटे (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 6701
रमेश गोफणे (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 6302 

पणदरे गट क्रमांक 2  

तानाजी कोकरे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8495
योगेश जगताप (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8635
स्वप्नील जगताप  (श्री निळकंठेश्वर पॅनल) 7933
(वरील तीनही उमेदवार विजयी आहेत)

रोहन कोकरे (सहकार बचाव पॅनल) 7083
रणजित जगताप (सहकार बचाव पॅनल) 6134
सत्यजित जगताप (सहकार बचाव पॅनल) 6232

सांगवी गट क्रमांक 3 

गणपत खलाटे  (श्री निळकंठेश्वर पॅनल)8543
चंद्रराव तावरे (सहकार बचाव पॅनल) 8163
विजय तावरे  (श्री निळकंठेश्वर पॅनल) 7882
(सांगवी गटातून सहकार बचाव पॅनलचे चंद्राराव तावरे विजयी…. तर अजित पवार गटाचे गणपत खलाटे आणि विजय तावरे विजयी झाले आहेत.)

रणजित खलाटे (सहकार बचाव पॅनल)7224
विरेंद्र तावरे  (श्री निळकंठेश्वर पॅनल) 7289
संजय खलाटे (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 6154

खांडज शिरवली गट क्रमांक 4 

प्रताप आटोळे  (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8328
सतीश फाळके (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8404
(वरील दोन्ही उमेदवार अजित पवार गटाचे विजयी)

विलास सस्ते (सहकार बचाव पॅनल) 6436
पोंदकुले मेघश्याम (सहकार बचाव पॅनल) 6422

निरावागज गट क्रमांक पाच 

अविनाश देवकाते (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8640
जयपाल देवकाते (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8051
(वरील दोन्ही उमेदवार अजित पवार गटाचे विजयी)

केशव देवकाते (सहकार बचाव पॅनल)6436
राजेश देवकाते (सहकार बचाव पॅनल)6499

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp