
Maharashtra Politics : खासदार संजय राऊतांनी एक सूचक ट्विट केलंय. खाटकाच्या लाकडावर बकरा उभा आहे, असा फोटो राऊतांनी ट्विट केलाय. मात्र या फोटोला राऊतांनी दिलेलं कॅप्शन अत्यंत सूचक आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात राऊतांच्या या फोटोसह कॅप्शनची जोरदार चर्चा रंगली आहे.
‘मी काही सांगितलं नाही, पण काहीतरी होतंय’..कालच्या ट्विटबाबत संजय राऊतांनी हे वक्तव्य केले आहे. खबर पता चली क्या… महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे..त्या बकऱ्याला उभा केलेला आहे आणि सांगितलेल्या आहे फार शहाणपणा केला तर मारू असं दिल्लीत या बकऱ्याच्या कानात कोणीतरी सांगितलं
तुम्हाला युबीटी माहित आहे तर एस एन ची गट माहित असायला पाहिजे. अहो असले ट्विट करून राजकारण होत नाही आम्ही बकरे आहोत मात्र तुम्ही मांजर नाही बिळात लपणारे उंदीर आहेत..एकनाथ शिंदे तुम्हाला पुरून उरले आहेत…संजय राऊत ला टीका करण्यात काय आनंद मिळतो माहिती नाही, आमची ताकत त्याला अजून कळली नाही का, आम्ही एक चिमटा घेतला तर तुमची लाही लाही झाली, तुम्हाला उध्वस्त केलं आम्ही, यांच्या जाचाला कंटाळलेले लोक सगळे आमच्या कडे येतील असा पलटवार संजय शिरसट यांनी संजय राऊत यांच्यावर केला. भाजपने ठाण्यातले प्रकल्प बंद पाडले, मुंबईत एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली कामं बंद पाडली, त्यांची गोची करून त्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार आहे असं विनायक राऊत म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.