
Maharashtra Local Body Election: राज्यात सध्या नगरपरिषद आणि नगरपचांयत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहेत. राज्यात विविध जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. इतकंच नव्हे तर, अनेक जिल्ह्यात महायुतीतील मित्र पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहेत. तर, अनेक जिल्ह्यात विरोधी पक्षांनी थेट सत्ताधारी पक्षासोबत युती केली आहे. सोलापुर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथेही शिंदेंच्या शिवसेनेने पवारांच्या राष्ट्रवादीशी युती केली आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावलेल्या आहेत. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिंदे शिवसेना यांची कुर्डूवाडी नगर परिषदेत झालेली निवडणूक पूर्व युती भविष्यातील नांदी ठरू शकते, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
नगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने राज्यातील अनेक ठिकाणी विविध पक्षांच्या आघाड्या झालेल्या आहेत. कुर्डूवाडी नगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाची सत्ता रोखण्यासाठी चक्क एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कुर्डूवाडी येथे काल रात्री सभा घेतली.
महाराष्ट्रात अनेक निवडणुका सुरू आहेत. मात्र सोलापुरच्या निवडणुकांमध्ये दररोज मोठ्या घडामोडी घडत आहेत. काही पक्ष लोकांचा फक्त फायद्यासाठी वापर करतात आणि नंतर सोडून देतात. एकनाथ शिंदेंचा केवळ वापर करुन घेतला. आपण तर सर्व साधी माणसं आहोत. पण लढणारी माणसे कधीच शरणागती घेत नसतात. कुर्डूवाडी मध्ये तुम्ही लोक आज एकत्र आलाय कदाचित भविष्यातल्या राजकारणाची नांदी ठरू शकते असं वक्तव्य शशिकांत शिंदे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
मतदार योग्य तो निर्णय घेतील- पवार
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ठिकठिकाणी राजकीय पक्षांमध्ये एकवाक्यता नाही, युती-आघाड्यांवर शरद पवारांचं वक्तव्य, मतदार योग्य निर्णय घेणार असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे. तसंच, पैसे किती द्यायचे यासाठी चढाओढ, महायुतीच्या नेत्यांच्या निधीबाबतच्या वक्तव्यांवर शरद पवारांनी टोला लगावला असून अर्थकारण करुन निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न असल्याचाही आरोप, त्यांनी केला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



