digital products downloads

महाराष्ट्राच्या शेतीला अमेरिकन ‘बळ’; प्रगत तंत्रज्ञानासाठी सरकारतर्फे दौरा: महाराष्ट्रातील शेतीमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचा उद्देश – Mumbai News

महाराष्ट्राच्या शेतीला अमेरिकन ‘बळ’; प्रगत तंत्रज्ञानासाठी सरकारतर्फे दौरा:  महाराष्ट्रातील शेतीमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचा उद्देश – Mumbai News


महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील कृषी उत्पादन, उत्पादकता आणि जागतिक बाजारपेठेतील निर्यात क्षमता वाढवण्यासाठी राज्य सरकारचे एक उच्चस्त

.

येत्या ९ ते १६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान अमेरिकेत होणाऱ्या जगप्रसिद्ध ‘नॅशनल फार्म मशिनरी शो’ २०२६ ला हे प्रतिनिधीमंडळ भेट देणार आहे. या प्रदर्शनात जगातील सर्वात प्रगत कृषी यंत्रसामग्री आणि स्वयंचलित तंत्रज्ञानाचे प्रदर्शन भरवले जाते. प्रिसिजन फार्मिंग (अचूक शेती), आधुनिक कापणी यंत्रे आणि मानवी श्रमाचा वापर कमी करणाऱ्या रोबोटिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून ते महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीनुसार कसे राबवता येईल, याचा आराखडा या दौऱ्यात तयार केला जाणार आहे. याचा थेट फायदा राज्यातील शेवटच्या शेतकऱ्याला तंत्रज्ञान स्वरूपात देण्याचे उद्दिष्ट आहे.

शेतकऱ्याला सक्षम करणे हेच ध्येय

अमेरिकेतील प्रगत तंत्रज्ञान आणि बाजारपेठ यांचा समन्वय साधून आपल्या शेतकऱ्याला जागतिक स्पर्धेत सक्षम करणे हेच मुख्य ध्येय आहे. अमेरिकेतील ‘नॅशनल फार्म मशिनरी शो’ द्वारे प्रिसिजन फार्मिंग आणि स्वयंचलित यंत्रसामग्री महाराष्ट्रात आणून मजुरांची टंचाई व वाढता खर्च यावर मात करण्याचा प्रयत्न आहे. केवळ उत्पादनावर लक्ष न देता, वॉशिंग्टन डी.सी. मधील बैठकांमधून महाराष्ट्रातील शेतीमालासाठी अमेरिकन बाजारपेठेची दारे उघडणे हा मोठा धोरणात्मक बदल आहे. काढणीपश्चात प्रक्रिया आणि प्रगत लॉजिस्टिक्सवर लक्ष केंद्रित केल्यामुळे शेतीमालाचे नुकसान कमी होऊन शेतकऱ्यांच्या हातात अधिक नफा पडेल.

या संपूर्ण दौऱ्याचा खर्च महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ करणार असून

हा दौरा केवळ यंत्रसामग्री पाहण्यापुरता मर्यादित नसून, महाराष्ट्रातील शेतीमालाला हक्काची जागतिक बाजारपेठ मिळवून देणे हा यामागचा मुख्य उद्देश असून वॉशिंग्टन डी.सी. येथे होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकांमध्ये महाराष्ट्रातील फळे, भाजीपाला आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या निर्यातीसाठी ‘रोडमॅप’ तयार केला जाईल. यामुळे थेट अमेरिकेच्या बाजारपेठेत महाराष्ट्राचा ब्रँड पोहोचण्यास मदत मिळणार आहे.

कृषी क्षेत्रात विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न

स्वयंचलित यंत्रसामग्री आणि प्रिसिजन शेतीचा अभ्यास, काढणीपश्चात प्रक्रिया, जागतिक दर्जाचे पॅकेजिंग आणि लॉजिस्टिक्स सुधारण्यावर भर. कृषी क्षेत्रात विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp