digital products downloads

महाराष्ट्रातील असाही आमदार, ज्यानं लेकीला धाडलं शासकीय आदिवासी आश्रम शाळेत; तुम्हीही कराल कौतुक!

महाराष्ट्रातील असाही आमदार, ज्यानं लेकीला धाडलं शासकीय आदिवासी आश्रम शाळेत; तुम्हीही कराल कौतुक!

प्रविण तांडेकर, झी 24 तास, गोंदीया: एकीकडे महाराष्ट्र मध्ये सर्वत्र इंग्रजी माध्यमांची शाळांची मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना मात्र अनेक अधिकारी, कर्मचारी, जनप्रतिनिधी हे आपापल्या मुलांना इंग्रजी शाळेकडे प्रवेश करण्यासाठी मोठमोठ्या रकमा देऊन मोठमोठ्या शाळेमध्ये प्रवेश घेत असतात. पण आमगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय. संपूर्ण महाराष्ट्र समोर एक उत्तम उदाहरण देत त्यांनी आपल्या मुलीला आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रम शाळेमध्ये प्रवेश दिला. एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रेरणादाई निर्णय त्यांनी घेतला. आता त्यांची मुलगी समृद्धी पूराळा गावातच वर्ग आठवीमध्ये शासकीय आश्रम शाळेमध्ये शिकणार आहे.

गावातील छोटासा पदधिकारीदेखील चांगलं शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून खासगी शाळेत आपल्या पाल्याचे नाव दाखल करतात. मुलांमागे लाखो रुपये खर्च करतात. असे असताना खामगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांनी महाराष्ट्रात एक मोठे उदाहरण निर्माण केले. त्यांच्या राहत्या गावी पुराडा ढीवरीनटोला येथे आदिवासी विकास विभाग एकात्मिक प्रकल्प अंतर्गत आदिवासी आश्रम शाळा आहे. पुराडा येथे असलेल्या या शाळेत त्यांनी मुलगी समृद्धी संजय पुराम हिला आठव्या वर्गात धाडलय. एक जनप्रतिनिधी म्हणून एक उत्तम उदाहरण संपूर्ण महाराष्ट्र समोरच नव्हे तर देशासमोर ठेवलंय. 

आमदार संजय पुराम यांनीसुद्धा आश्रम शाळेतूनच शिक्षण घेतले असून आपल्या मोठा मुलगा बिरसा संजय पुरामसुद्धा पहिल्या वर्गापासून बाराव्या वर्गापर्यंत आदिवासी आश्रम शाळा पुराडा इथेच शिक्षण दिले. आता त्यांची लहान मुलगी समृद्धीलासुद्धा आदिवासी आश्रम शाळा पुरवठा या ठिकाणी दाखला देत संपूर्ण महाराष्ट्र समोर एक उदाहरण सादर केले आहे.

‘जर याचप्रमाणे महाराष्ट्रातील आणि देशातील संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी शासकीय शाळेत आपल्या मुला मुलींना प्रवेश दिला तर शाळांचा कायापालट होण्यास कोणी रोखू शकत नाही. शासकीय शाळेत दर्जेदार आणि उत्तम शिक्षण मिळेल. कोणत्याही व्यक्तीला खासगी शाळेत आपल्या मुला मुलींना प्रवेश देऊन लाखो रुपये खर्च करण्याची गरज पडणार नाही’ अशी प्रतिक्रिया शासकीय आश्रम शाळा पुराडा येथील मुख्याध्याप कापसे यांनी दिली.

आमदाराची मुलगी आपल्या शाळेत शिकतो म्हणजे आमदाराच्या लक्ष शाळेकडे जास्त राहील आणि निश्चितच याचा फायदा शाळेला मिळेल, असे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी उमेश कासिद यांनी म्हटलंय. ही आमच्यासाठी मोठ्या गौरवाची गोष्ट आहे. आमदारांनी आश्रम शाळेवर विश्वास दाखवत आपल्या मुलीला आदिवासी आश्रम शाळेत दाखला दिला. निश्चितच यामुळे समाजासाठी मोठं उदाहरण निर्माण झालं असल्याचंही ते म्हणाले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp