
Maharashtra Government Schemes: शासनाच्या योजना प्रत्येक घरात पोहोचल्या पाहिजेत यामुळे शिवसेनेकडून एक उपक्रम राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत राज्यभरात धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता केंद्र उभारले जाणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली. या सहायता केंद्रमार्फत शासनाच्या योजना प्रत्येक घरात पोहोचवल्या जाणार आहेत. या सहायता केंद्रमार्फत जनसामान्यांना तालुक्यापर्यंत येण्याची गरज पडणार नसल्याचे उदय सामंत म्हणाले. 3 ऑक्टोंबर अभिजात भाषा दिन हा मराठी भाषा सप्ताह आम्ही साजरा करतो. या कार्यक्रमाची सांगता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार आहे. पहिल्या वर्धापन दिनी आम्ही मोदींचे आभार मानतो. अमरावती संभाजी नगर येथे ही कार्यक्रम होणार असल्याचे सामंत म्हणाले. काल दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकाबाबत कामाला लागणयाच्या सूचना दिल्या. काही लोक टिका टिपण़्णी मोकळ्या खूर्च्यांसमोर केली. आम्ही आमच्या राज्यभरातील पदाधिकार्यांना न येता पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केल्याचे उदय सामंत म्हणाले.
‘शिवसेना आपल्या दारी घेऊन आली शिदोरी’
‘शिवसेना आपल्या दारी घेऊन आली शिदोरी’ हा उपक्रम आम्ही सुरू करत आहोत. ग्रामीण भागातील लोकांना विविध योजनांची माहिती किंवा ती मिळवून देण्यासाठी आमचे पदाधिकारी मदत करतील. कालच्या मेळाव्याला किती गर्दी होती हे तुम्ही दाखवलं. मोकळ्या खुर्चा पाहून आम्ही कसं चिखलात लोळवलं हेही आपण पाहिलं. कार्यकर्त्याला विनाकारण त्रास देऊन चिखलात बोलवलं नाही. तर राज्यभरात मदत पुरवली यासह अनेक उपक्रम आपण केले. मुलांचे शिक्षणाला काही कमी पडू नये यासाठी साधन सामग्रीही आम्ही उपलब्ध करून दिली. प्रत्येक शिवसैनिकाने रिलिफ फंडातही पैसे देण्याचे आवाहन केले. हा दोन मेळाव्यातील फरक असल्याचे उदय सामंत म्हणाले.
‘शिंदेवरील टिका खपवून घेणार नाही’
यावेळी उदय सामंत यांनी गणेश नाईकांच्या विधानावरही भाष्य केले. नालायकांच्या हाती सत्ता देऊ नये, म्हणजेच त्याच्या हाती सत्ता दिली जाणार नाही. मुख्यमंत्र्याना हे पटतं का ? समन्वय समितीतही संवाद साधण्यासाठी आहे. उठसूट एकनाथ शिंदेवर टिका खपवून घेणार नाही. नाईकांना काही अडचणी असतील तर त्यांनी शिंदेंची वेळ घ्यावी. ज्याची ज्या पद्धतीने कुवत असते त्याला ते पद मिळते. आमच्या खासदारांनाही बोलता येत नाही का पण साहेब सांगतात की मित्र पक्षावर बोलू नका म्हणून सर्व शांत आहेत, असेेही सामंत म्हणाले.
राजन तेलींकडे काय जबाबदारी?
राजन तेलींच्या पक्ष प्रवेशावरही उदय सामंतांनी भाष्य केले. कोकणात कुठेही रस्सीखेच नाही. दिपक केसकर यांचा सन्मान आहे ते फायदाच करतील. तेली हे कणकवली मतदार संघावर फोकस करतील. केसरकर सांगतील तोच उमेदवार ठरेल. जिथे आमदार नाहीत तिथे तेली संघटना मजबूत करतील, असे उदय सामंत म्हणाले.
राऊतांवर टीका
यावेळी उदय सामंतांनी संजय राऊतांवर टीका केली. कोणाच्या सांगण्याने कोणाची डिग्री खोटी ठरत नाही. आपल्या दिव्याखाली किती अंधार आहे ते पहावं. काल खूर्च्या का खाली होत्या ते पहावं. अनंत अडचणी येऊन सुद्धा जो आपली इमेज करतो, जे काही चाललय फार चुकीचं आहे. नियती बघतेय, काळ उत्तर नक्की देईल. जनतेने उत्तर दिलयं गर्दी कुठे होती हे पाहीलं. जी लोकं मुंबईतून बाहेर गेली आहेत त्यांना आणण्याची जबाबदारी शिंदेंनी स्विकारली हे कोणाला तरी झोंबत आहे. स्वत:ची सत्ता गेली की काही कारण द्यायचं मग आरोप करायचे, असे सामंत राऊतांना उद्देशून म्हणाले.
FAQ
धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता केंद्र म्हणजे काय आणि त्याचा उद्देश काय आहे?
उत्तर: धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता केंद्र हे शिवसेनेने सुरू करणारा उपक्रम आहे, ज्यामध्ये राज्यभरात अशी केंद्रे उभारली जातील. याचा मुख्य उद्देश शासनाच्या विविध योजनांना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे आहे. जनसामान्यांना तालुक्यापर्यंत जाण्याची गरज पडणार नाही; हे केंद्रे स्थानिक पातळीवर सेवा पुरवतील.
प्रश्न: ‘शिवसेना आपल्या दारी घेऊन आली शिदोरी’ हा उपक्रम काय आहे?
उत्तर: हा शिवसेनेचा नवीन उपक्रम आहे, ज्यामध्ये ग्रामीण भागातील लोकांना शासनाच्या योजनांची माहिती देणे आणि त्यांचा लाभ मिळवून देणे हे मुख्य काम आहे. पदाधिकारी स्थानिक पातळीवर मदत करतील. उदय सामंत यांनी सांगितल्याप्रमाणे, यामुळे जनतेच्या सोयीची वाढ होईल आणि योजनांचा प्रसार व्हईल.
प्रश्न: उदय सामंत यांनी गणेश नाईक यांच्या विधानावर काय प्रतिक्रिया दिली?
उत्तर: गणेश नाईक यांच्या “नालायकांच्या हाती सत्ता देऊ नये” या विधानावर उदय सामंत यांनी टीका केली. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्यावर उठसूट टीका खपवून घेतली जाणार नाही. नाईक यांना अडचणी असतील तर शिंदे यांची वेळ घ्यावी. मित्र पक्षावर बोलू नये, असे साहेब सांगतात म्हणून सर्व शांत आहेत, असेही ते म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.