
Maharashtra Local Body Election 2025 : लवकरच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगातर्फे मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. प्रारुप मतदार यादीवर हरकती आणि सूचना मागवल्या जाणार आहेत.
राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केली जाईल.
निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे, नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही.
हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या हरकती व सूचनांच्या अनुषंगाने करण्यात येतात.
FAQ
1. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा कार्यक्रम काय आहे?
महाराष्ट्रातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध होईल, त्यावर १४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील, आणि अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर होईल.
2. मतदार यादीसाठी अधिसूचित दिनांक काय आहे?
अधिसूचित दिनांक १ जुलै २०२५ निश्चित करण्यात आला आहे. या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी आधारभूत म्हणून वापरली जाईल.
3. प्रारूप मतदार यादी कधी प्रसिद्ध होईल आणि हरकती कधी दाखल करता येतील?
जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर ८ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करता येतील.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.