
Mumbai- Bikaner Express: राजस्थानच्या बीकानेर येथे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 18 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशामध्ये असलेले 86 जिल्ह्यांमध्ये असलेले 103 पुनर्विकसित अमृत स्थानकांचे उद्घाटन केले. त्या व्यतिरिक्त २६,००० कोटी रुपयाहून अधिक किंमत असलेल्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी वांद्रे टर्मिनस ते बीकानेरपर्यंत धावणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
ट्रेन संख्या 21903/21904 वांद्रे टर्मिनस – बीकानेर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
ट्रेन क्रमांक 21903 वांद्रे टर्मिनस – बिकानेर एक्सप्रेस दर सोमवारी वांद्रे टर्मिनसहून 23.25 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी 20.40 वाजता बिकानेरला पोहोचेल. ही ट्रेन 26 मे 2025 पासून धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्र. 21904 बिकानेर – वांद्रे टर्मिनस एक्सप्रेस दर बुधवारी बिकानेरहून सकाळी 08.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 06.45 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचेल. ही ट्रेन 28 मे 2025 पासून धावेल.
या स्थानकांवर ट्रेन थांबेल
ही गाडी बोरीवली, वापी, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, नडियाद, साबरमती, महेसाणा, पालनपूर, अबू रोड, फलना, मारवाड, पाली मारवाड, जोधपूर, मेर्टा रोड, नागौर, नोखा आणि देशनोक स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. या ट्रेनमध्ये एसी 3-टायर (इकॉनॉमी) आणि एसी चेअर कार कोच आहेत.
21903 क्रमांकाच्या ट्रेनचे बुकिंग 23 मेपासून सर्व पीआरएस काउंटर आणि आयआरसीटीसी वेबसाइटवर सुरू होईल. गाड्यांचे थांबे, वेळा आणि रचना याबद्दल तपशीलवार माहितीसाठी, प्रवासी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देऊ शकतात.
वंदे भारत 70 मार्गांवर सुरू
रेल्वेच्या विकासकामांचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले, “सध्या देशात सुमारे 70 मार्गांवर वंदे भारत गाड्या धावत आहेत. यामुळे आधुनिक रेल्वे अगदी दुर्गम भागातही पोहोचली आहे. गेल्या 11 वर्षांत शेकडो रस्ते ओव्हरब्रिज आणि रस्ते अंडरब्रिज बांधण्यात आले आहेत. 34 हजार किमी पेक्षा जास्त नवीन ट्रॅक टाकण्यात आले आहेत. या अमृत भारत रेल्वे स्थानकांवर ‘विकासासोबतच वारसा’ हा मंत्र स्पष्टपणे दिसतो. ही स्थानिक कला आणि संस्कृतीची नवीन प्रतीके देखील आहेत.”
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.