
Maharashtra State Moh Flower Wine : तुम्ही आतापर्यंत वाईनचे अनेक प्रकार पाहिले असतील. मद्यप्रेमींनी तर वेगवेगळ्या चवीच्या वाईन पिऊनही पाहिल्या असतील.. काळी द्राक्षं, हिरव्या द्राक्षांच्या वाईनचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. पण या वाईनच्या भाऊगर्दीत आता मराठमोळ्या वाईनचा एक वेगळा ब्रँड येऊ घातलाय. हा ब्रँड आहे मोहफुलाच्या वाईनचा.महाराष्ट्र सरकारच्या शबरी विकास महामंडळ आणि सॅम ऍग्रो या कंपनीच्या सहकार्यानं मोहफुवाची वाईन तयार करण्यात आली आहे. मुख्य बाब म्हणजे या वाईनमध्ये अल्कहोलचं प्रमाण 34 टक्क्यांवर न ठेवता 12 टक्क्यांवर आणण्यात आलंय. शिवाय मोहफुलाचा जो उग्र गंध आहे तोही कमी करण्यात आलाय.
आदिवासी भागातील मोहा फुलांची झाडे फुलली की जणू आदिवासींसाठी कल्पवृक्ष फुलतो. देवा समान पुजणाऱ्या या वृक्षाला आदिवासी बांधव अनन्यसाधारण असे महत्त्व देतात याच फुलांपासून बिस्किटांपासून ते वाईन पर्यंत वेगवेगळे खाद्यपदार्थ शबरी विकास महामंडळाने तयार केले आहेत. आता महामंडळाच्या संकेतस्थळावर या सर्व वस्तू उपलब्ध असणार आहेत
मोहफुलाचा वापर हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी केला जात होता. मोहफुलांना बाजारात फारशी किंमतही मिळत नाही. पण मोहफुलाच्या वाईनमुळं फुलं गोळा करणा-या आदिवासींना रोजगाराचं एक हक्काचं साधन मिळालंय. शिवाय मोहफुलाला प्रतिष्ठाही मिळणार आहे. शबरी विकास महामंडळानं आतापर्यंत मोहफुलाची बिस्कीटं, लाडू बनवण्याचा प्रयोग केला होता. पण यावेळी मोहफुलाची वाईन तयार करण्याचा प्रकल्प अतिशय वेगळा मानला जातोय.
द्राक्षाची वाईन पिणारा एक वर्ग आहे. उच्चवर्गीयांमध्येही मोहफुलाची वाईन लोकप्रियता निर्माण करील अशी अपेक्षा आहे. मोहफुलाच्या वाईननं उच्चवर्गीयांत स्थान मिळवल्यास वाईन इंडस्ट्रीलाही त्याचा मोठा फायदा होईल. तसंच मोहफुलं गोळा करणा-या आदिवासींनाही त्याच्या फायद्याचा गोडवा चाखता येणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.