
Nagpur Marbat Utsav : ‘सगळं अशुभ,अमंगळ… घेऊन जा ऽऽ गे मारबत ऽऽऽ!’ या आरोळ्यांनी शहर दुमदुमते. बैल पोळ्यानंतर दुसऱ्या दिवशी विदर्भात तान्हा पोळा साजरा करण्यात येतो. याच तान्हा पोळ्यादिवशी नागपुरात 145 वर्षांपासून अनोखा मारबत उत्सव साजरा करण्यात येतो. जुन्या नागपुरातील महाल – इतवारी भागात ही परंपरा आजही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, नागपुरातील हा मारबत उत्सव गणेशोत्सवापेक्षाही जुना आहे. (Marbat Utsav has been going on for 145 years in Nagpur Maharashtra black yellow Marbat and Badgya Utsavs)
काळ्या – पिवळ्या मारबत आणि बडग्या उत्सव नेमका काय?
मारबत उत्सव केवळ एक धार्मिक सोहळा नसून समाजातील वाईट प्रवृत्तींचा निषेध करण्याचा आणि सामाजिक संदेश देण्याचा एक प्रभावी माध्यम म्हणूनही याकडे आजही पाहिलं जातं. त्यामुळेच हा उत्सव प्रत्येक वर्षी नव्या जोमानं नागपूरकर साजरा करतात.
पिवळी मारबतची परंपरा काय?
या मारबतमध्ये एक पिवळी आणि काळी मारबत असते. या पिवळी आणि काळी मारबतमागे एक परंपरा आहे. यातील पिवळी मारबतबद्दल जाणून घेऊयात. 1885 साली, नागपूरच्या जगन्नाथ बुधवारी परिसरातील तेली समाज बांधवांनी पिवळी मारबत उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. या वर्षी पिवळ्या मारबतीला 141 वर्षे पूर्ण झाली आहेत. लोकांच्या रक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या पिवळी मारबतीची भव्य मिरवणूक काढण्यात येते. मिरवणुकीनंतर पिवळ्या मारबतीचे दहन करण्यात येत. या मिरवणुकीदरम्यान महिला लहान मुलांना घेऊन दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात, ही या परंपरेची खास वैशिष्ट्ये आहेत.
काळी मारबतची परंपरा काय?
काळी मारबतची परंपरा 144 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. त्याकाळी भोसले राजघराण्यातील बाकाबाई यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केल्याच्या विरोधात काळी मारबत काढण्यात आली होती. या परंपरेचा उल्लेख महाभारतही दिला जातो. तेव्हापासून आजपर्यंत ही परंपरा नागपूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
पोळा सणाच्या चार दिवसांपूर्वी नागपूर शहरात पिवळी आणि काळी मारबत यांची स्थापना करण्यात येते. या दोन्ही मारबतींना पूजण्यासाठी नागपूरकर मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. काळी मारबत ही दुर्जनांचे प्रतीक मानली गेली असून तिची 145 वर्षांची ऐतिहासिक परंपरा नागपुरात जोपासण्यात आली आहे. तर, पिवळी मारबत देवीचे रूप मानली जाते. तिची भक्तिभावाने पूजा केली जाते.
बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी या मारबतींची मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत काळी आणि पिवळी मारबत यांच्यासह बडगेदेखील तयार करून प्रदर्शित केले जातात. मारबत म्हणजे समाजातील वाईट रूढी, अंधश्रद्धा, आणि अनिष्ट प्रथांचे प्रतीक, ज्यांचे दहन करून समाजात चांगल्या विचारांचे स्वागत करणे हा मुख्य उद्देश असतो. काळी मारबत ही कृष्णाच्या वधासाठी आलेल्या पुतना मावशीचे प्रतीक मानली जाते. तर पिवळी मारबत ही लोकांचे रक्षण करणारी देवी म्हणून ओळखली जाते. या दोन्ही मूर्ती मोठ्या आकारात बनवून पारंपरिक पद्धतीनं त्यांची पूजा आणि मिरवणूक केली जाते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.