
CM Devendra Fadanvis: वरळी येथील जांभोरी मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 या कार्यक्रमात विद्यमान आणि सर्वच माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि या राज्याचे चार वेळा नेतृत्व करणारे आदरणीय शरद पवार यांना देखील आमंत्रण देण्यात आले होते.
कधी काळी शिवसेनेत काम केलेले नारायण राणे आणि छगन भुजबळ या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आहेत. यावेळी अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी 72 तासांच्या शपथविधीचा उल्लेख केला.
गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अभिनंदन केले. सुनील तटकरे यांनी आम्हाला इथली दालने दाखवली. ती दालने खूप सुंदर असून शालेय विद्यार्थ्यांनी ती दालने बघितली पाहिजेत. शक्ती आणि भक्तीचा इतिहास इथं पाहायला मिळतो. महाराष्ट्रातील रत्न इथं पाहायला मिळतात. इथं खाण्याचे स्टॉल आहेत ते माहिती असतं तर तासभर आधी आलो असतो. मी नेहमी पुन्हा येईन म्हणतो आणि पण इथं या प्रदर्शनात मी नक्कीच पुन्हा येईन, असे ते म्हणाले.
मी 3 वेळा मुख्यमंत्री झालो. एकदा 72 तासांचा मुख्यमंत्री झालो. सलग 5 वर्षे मुख्यमंत्री राहिलो आणि त्यानंतर 72 तास मी मुख्यमंत्री राहिलो. त्यामुळे सर्वात अधिक आणि सर्वात कमी काळ मुख्यमंत्री होण्याचा विक्रम माझ्या नावावर आहे. तर सर्वाधिक वेळा आणि दरम्यानच्या काळात सर्वात कमी वेळ 72 तास उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजितदादांच्या नावावर असल्याचे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात सध्या असलेल्या समिकरणांची मुहूर्तमेढ त्या 72 तासांच्या काळातच विद्यमान रोवली गेली होती, असे फडणवीस म्हणाले. सगळेच माजी मुख्यमंत्री आले असते तर बरं झालं असतं कारण हा मंच राजकीय नाही. जे आले त्यांचा सत्कार आणि नाही आले त्यांचा मनातून सत्कार असल्याचे ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या वतीने मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा सन्मान स्वीकारला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.