
Maharashtra Local Body Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका चार महिन्याचे घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशामुळे निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला असला तरी प्रभाग रचनेकडे मात्र राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले होते. पुणे महापालिकेसाठी नवीन प्रभाग रचना लागू केली जाईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, प्रभाग चार की तीन सदस्यांचा याबाबत अद्यापही संभ्रम कायम होता. मात्र आता राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेसाठी प्रभाग चार सदस्यांचा असणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. पालिका आयुक्तांनी प्रभाग रचना तयार करून निवडणूक आयोगाच्या समोर मान्यतेसाठी ठेवण्यात यावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील महापालिकांच्या आगामी निवडणुकांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेत, राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, पुणे पालिकेसाठी नवीन प्रभाग (प्रभाग) रचना लागू केली जाईल, तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत २०१७ ची जुनी प्रभाग रचना कायम ठेवली जाईल. असे जाहीर करण्यात आले होते. पुणे मनपा हद्दीत 23 गावांचा नव्याने समावेश झाला असल्याने त्यासाठी पुन्हा नव्याने प्रभाग रचना प्रक्रिया पार पाडावी लागेल तर पुणे शहराच्या जुन्या हद्दीतली प्रभाग रचना कदाचित आहे तसेच राहू शकते असी सूञांची माहिती आहे.
पुणे मनपाचे नवे आयुक्त नवल किशोर राम नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वपक्षीय इच्छुकांचे लक्ष आहे. महापालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये होऊ शकतात, हे नक्की. त्यात, 2017 च्या प्रभाग रचनेनुसारच निवडणूक होईल. मुंबईत १ सदस्यीय तर उर्वरित राज्यात ४ सदस्यांचा प्रभाग असू शकतो. याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याचा सरकारचा आदेश आहे.
मनपा निवडणुका वेळेत घेण्यासाठी प्रभार रचना आणि मतदार याद्या प्रसिद्ध करा, नगरविकास खात्याचे संबंधित मनपा आयुक्तांना आज निर्देश जारी करण्यात आले.
पुणे, नागपूर अ वर्ग मनपा
ब वर्गात
ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड
क वर्गात
नवी मुंबई
छञपती संभाजीनगर
वसई विरार
कल्याण डोंबिवली
या 4 मनपांचा समावेश
पुणे, नागपूर अ वर्ग मनपा
ब वर्गात
ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड
क वर्गात
नवी मुंबई
छञपती संभाजीनगर
वसई विरार
कल्याण डोंबिवली
या 4 मनपांचा समावेश
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.