
Unseasonal Rain In Maharashtra : महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे महाराष्ट्रात अत्यंत भयानक वातावरण पहायला मिळत आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ऐन उन्हाळ्यात तुफान पाऊस झाला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर सह अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे.
सोमवारी दुपारी हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांसह गोवा राज्याला अचानक पावसाने झोडापले. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस, बांदा, आणि दोडामार्ग तालुक्यातील पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्यमार्गांवर उन्माळलेली झाडे रस्त्यावर कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे या भागात वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
गोव्यात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली असून, काही ठिकाणी वाहतूक खोलबली झाली आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक वाहनं अडकली आहेत. पावसाच्या जोरदार हजेरीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीजपुरवठ्याचा बिघाड झाला आहे, आणि अनेक ठिकाणी लाइट बंद पडल्या आहेत.
हवामान खात्याने अधिक पावसाच्या अंदाजाची माहिती दिली आहे, आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने रस्त्यांवर सफाई आणि मदतकार्य सुरू केले आहे. तरीही, नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याची आणि आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. विजांच्या गडगडडाटासह जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे कोकमातील आंबा काजू पिक धोक्यात आले आहे.
सांगलीच्या मिरज शहरासह परिसराला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. प्रचंड वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसलाय. मिरज परिसरात कोसळलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावरची झाडे देखील ऊन्मळून पडलीत,तर काही घरांची पत्रे देखील उडून गेल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता,त्यामुळे उघड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पाऊसाने दिलासा मिळाला आहे. मात्र अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ देखील उडाली आणि काही काळ जनजीवन विस्कळीत देखील झालं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.