
Kolhapur Gazette after Hyderabad Satara : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजानं मुंबईत मोठं आंदोलन केले. या आंदोलनानंतर राज्य सरकारने जीआर काढत जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या. यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील मागणीही सरकाने मान्य केली. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील कुणबी नोंदी असणा-यांना ओबीसीतून आरक्षणाचा लाभ देण्यासाठी सातारा आणि औंध गॅझेटियरचा संदर्भ घेण्यात येणार आहे. हैदराबाद, सातारानंतर कोल्हापूर गॅझेटची चर्चा सुरु झाली आहे. कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी समाजाबाबत अत्यंत महत्वाची नोंद आहे.
1881 च्या कोल्हापूर गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचा उल्लेख आढळून आला असा दावा कोल्हापुरातील मराठा समाजाचे समन्वयक दिलीप देसाई यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा हा कुणबी असल्याचे सिद्ध होतय अस देखील देसाई यांनी म्हटलंय.
सातारा गॅजेटमध्ये काय आहे?
पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील कुणबी नोंदी असणा-यांना ओबीसीतून आरक्षणाचा लाभ देण्यासाठी सातारा आणि औंध गॅझेटियरचा संदर्भ घेण्यात येणार आहे. 1885 च्या शासकीय राजपत्रात म्हणजेच गॅझेटमध्ये सातारा जिल्ह्यातील मराठे हे कुणबी पेक्षा वेगळे नसल्याची नोंद आहे. त्यांच्या वंशपरंपरा एकच आहेत. विवाह पद्धती धार्मिक कार्यक्रम आणि आडनावे त्याचबरोबर शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याची नोंद या गॅझेटमध्ये आढळते. 1885 च्या सातारा गॅझेटियर मध्ये 1881 च्या जनगणनेत पाच लाख 83 हजार कुणबी नोंद असल्याचे देखील नमूद आहे. सातारा संस्थांनचे छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांनी 1819 मध्ये जनगणना राबवली होती. ही जनगणना जात निहाय होती. या जनगणनेत शेती करणाऱ्या मराठ्यांच्या गावागावात कुणबी म्हणून नोंदी आढळतात. ज्यांचा व्यवसाय शेती आहे परंतु ते मराठा समाजातील आहेत त्यांची कुणबी म्हणूनच नोंद करण्यात आली आहे. परंतु काही ठिकाणी कुणबींचा मराठा म्हणून सुद्धा उल्लेख आढळतो. हीच पद्धत पुढे ब्रिटिशांनी सुरू ठेवली. सध्या चर्चेत असलेल्या 1885 च्या गॅझेटमध्ये या नोंदी आढळतात.
हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा
हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी आता बीडमधून बंजारा समाजाने केली आहे.. या मागणीला गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी पाठिंबा दर्शवलाय. तसेच तशी मागणी हिवाळी अधिवेशनात करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केले. सध्या बंजारा समाज VJNT प्रवर्गात आहे. बीडच्या गेवराई येथे बंजारा समाजाची बैठक पार पडली आणि याच बैठकीतून बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याची मागणी केली जाते आहे. वेळ पडली तर रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा देखील बैठकीतून देण्यात आला. राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा अध्यादेश काढला. याला पुण्याच्या इंदापूरमधून विरोध केला जातोय. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी इंदापूरमध्ये ओबीसी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली.
FAQ
1 मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा परिणाम काय झाला?
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मुंबईत मोठे आंदोलन केले. त्यानंतर राज्य सरकारने GR काढून त्यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या, ज्यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा समावेश आहे.
2 हैदराबाद गॅझेट म्हणजे काय आणि त्याचा मराठा समाजाशी संबंध काय?
हैदराबाद गॅझेट हे निझाम सरकारने 1918 मध्ये जारी केलेले दस्तऐवज आहे, ज्यामध्ये मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी म्हणून वर्गीकृत केले आहे. या आधारावर मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळू शकतो.
3 सातारा गॅझेटमध्ये काय नोंदी आहेत?
1885 च्या सातारा गॅझेटमध्ये सातारा जिल्ह्यातील मराठे आणि कुणबी हे वेगळे नसल्याचे नमूद आहे. त्यांच्या वंशपरंपरा, विवाह पद्धती, धार्मिक कार्यक्रम, आडनावे आणि शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याची नोंद आहे. 1881 च्या जनगणनेत 5,83,569 कुणबी नोंदी असल्याचेही उल्लेख आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.