
Saqib Nachan Death: साकिब नाचन यांच्या मृत्यूची बातमी समजताच भिवंडीतील पडघा गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. साकिब नाचन भिवंडीतील पडघा गावात राहत होता. सुरक्षेच्या कारणास्तव गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दहशतवादी कारवायात साकिब नाचन सक्रिय होता. तसेच 2003 च्या बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्याला दिल्लीतील तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. तुरुंगात असताना त्याची तब्येत बिघडली आणि उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे.
डिसेंबर 2023 मध्ये अटक झाल्यानंतर तो गेल्या काही महिन्यांपासून तिहार जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत होता. काही दिवसांपूर्वी मेंदूतील रक्तस्रावाची लक्षणं दिसल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नाचनवर मुस्लिम तरुणांना आयएसआयएसमध्ये भरती करण्याचा आणि भारतात इस्लामी राजवट प्रस्थापित करण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता.त्याच्या मृत्यूचे वृत्त समजताच पडघा पोलिसांनी सुरक्षेसाठी पडघा आणि बोरवली गावात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे
भिवंडी तालुक्यातील पडघा येथील बोरवली गावचा रहिवासी साकिब नाचन हा मुंबई सेंट्रल, विलेपार्ले, मुलुंड रेल्वे स्थानकांवर झालेल्या बॉम्बस्फोटात सहभागी होता. साकिब ला दहशतवादी प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. त्यामुळे 2003 च्या बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. 2017 मध्ये शिक्षा भोगल्यानंतर तो पुन्हा कट्टरतावाद्यांमध्ये सामील झाला. 2023 मध्ये पुन्हा साकिबला आयसीआयएस मॉड्यूल प्रकरणात अटक करण्यात आली
काही महिन्यांपूर्वी झालेल्या हेरगिरी प्रकरणात त्याचा संबंध कुठे आहे का? महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला याचा संशय आला आणि त्यानुसार त्यांनी त्याच्या घरावर छापा टाकला. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या घरावर छापा टाकण्यात आला. यावेळी साकिबच्या खात्यात परदेशातून आणि भारतातून मोठ्या प्रमाणात पैसे आले होते. यात बोरिवलीतील अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी छापे टाकण्यात आले. साकिब हा बंदी घालण्यात आलेल्या सिमी (सिमी) या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. मागील आठवड्यात साकिब नाचन यांची प्रकृती बिघडली आणि चिंताजनक झाली होती त्याच्यावर दिल्लीतील दीनदयाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. या पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण आणि स्थानिक पडघा पोलिस ठाण्याने बोरिवली गावात व परिसरात सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.