
Mira Bhayandar Municipal Corporation Election : मीरा भाईंदरमध्ये कृपाशंकर सिंह यांनी एक वक्तव्य केलं आहे. उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू असं वक्तव्य कृपाशंकर सिंह यांनी केलं होते. आता मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर होऊ शकते इतक्या जागा भाजपने जिंकल्या आहेत. एक्सीट पोलच्या आकडेवारीनुसार मीरा भाईंदरमध्ये भाजपने रेकॉर्डब्रेक जागा जिंकल्याचा कल पहायला मिळत आहे. यामुळे भाजपचाच महापौर होऊ शकतो.
मुंबईच्या बाजूला असणारे मीरा-भाईंदर शहर गेल्या काही वर्षात विकासात कात टाकत आहे.. मुंबईच्या उपनगरात वेगाने विकसित होणारी महानगरपालिका म्हणून मीरा–भाईंदरची ओळख आहे. सुनियोजित रस्ते, वाढती व्यावसायिक केंद्रे आणि मराठी, गुजराती , मारवाडी, मुस्लिम व त्याचसोबत उत्तर भारतीय असे संमिश्र मतदार आहेत. मात्र, मागील काही
दिवसात भाषा वादावरून मीरा-भाईंदर चांगलंच चर्चेत राहिलं आहे. मीरा-भाईंदरमध्ये शिंदेंची शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक युतीसाठी इच्छूक होते, मात्र, नरेंद्र मेहतांचा युतीला विरोध होते.मीरा-भाईंदर पालिकेत हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधता लढले.
मीरा-भाईंदरमध्ये एकूण 95 जागांसाठी निवडणूक झाली. भाजप 87 जागांवर, शिवसेना 81, ठाकरेंची शिवसेना 56, मनसे 11, काँग्रेस 32, अजित पवार 33, शरद पवार 14, रिपाई 01 जागांवर उमेदवार उभे केले. रुद्र एक्सीट पोलच्या आकडेवारीनुसार भाजप 50 ते 55 जागा जिंकू शकते. तर, शिंदेच्या शिवसेनेला 25 ते 30, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2 ते 3 जागा, काँग्रेसला 8 ते 10 जागा, ठाकरेंची शिवसेना 5 ते 7 जागा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 1 ते 2 जागा, मनसेला 1 जागा मिळू शकते. तर, इतर अपक्ष 3 ते 4 जागांवर विजय मिळवू शकतात. मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक भाजपने निवडणू आणू शकतो असा एक्सीट पोलचा कल दिसत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



