
MNS Mira Bhayandar Morcha : मीरारोडमध्ये आज मराठी माणसाची ताकद दिसून आली..मराठी माणसांसाठी मनसेने हा मोर्चा काढण्याची घोषणा केली. सुरुवातीला या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. मनसैनिकांची धरपकड करण्यात आली. मात्र मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. आमच्यावर अन्याय का? आमच्या मोर्चाला परवानगी का नाकारली ? असे प्रश्न उपस्थित केले. अखेर मोर्चाला परवानगी मिळाल्यानंतर मनसेने मीरारोडमध्ये मोर्चा काढला. या मोर्चात कार्यकर्ते, आंदोलक. मराठी माणूस ,सहभागी झाला. बघता बघता मीरारोडमध्ये रस्ता दिसेनासा झाला.. सगळीकडे मनसे आणि शिवसेना UBT पक्षाच्या कार्यकर्त्यांनी , मराठी प्रेमींनी मोर्चात सहभाग घेतला. संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, राजन विचारे लोकलने प्रवास करत या मोर्चात सहभागी झाले.
मीरा भाईंदरमधील मोर्चातून भाजप नरेंद्र मेहता यांच्यावर निशाणा साधलाय.. मीरा भाईंदरमध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी भाषिक वाद निर्माण करण्याचं षढयंत्र रचल्याचा आरोप अविनाश जाधवांनी केलाय.. त्यामुळे नरेंद्र मेहतांना मराठी माणूस जागा दाखवणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. अविनाश जाधव चांगलेच आक्रमक झाले. पोलिसांनी कितीही दडपशाही केली अगदी दीड हजार लोकांना नोटीस पाठवली. तरीही हा मोर्चा इतका यशस्वी झाला. जर पोलिसांनी यामध्ये कारवाई केली नसती तर हा आकडा पन्नास हजार लोकांपर्यंत पोहोचला असता. मीरारोडचा एक आमदार सांगतो की, येथे 12 ते 14 टक्केच मराठी माणूस आहे. पण हा एवढाच मराठी माणूस पुरेसा आहे. हा मोर्चा जर ठाण्यात झाला असता तर काय झालं असतं? असा सवालही अविनाश जाधव यांनी विचारला.
महाराष्ट्रात मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केलात तर कानाखालीच बसेल, असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. मला असं वाटतं, जो संदेश आपल्याला द्यायचा होता. इथे 2000 मैलावरुन येऊन दादागिरी नाही करायची. हा महाराष्ट्र इथे काय होणार? आणि काय होणार हे आम्ही मराठी माणूस ठरवणार. इथे धंदा करायला आलात ना गपचुप धंदा करा. उगाच कावकाव करु नका. नरेश, सुरेश पडेल… कानाखालीच पडेल. मराठी असल्याचा फक्त गर्व नाही तर माज आहे असं संदीप देशपांडे यांनी मीरारोड येथील मोर्चात म्हटलं आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी एकीकरण समिती यांचे राजन विचारे यांनी आभार मानले आहेत. हिंदी सक्तीचा जीआर रद्द करुन सरकारला नमावं लागलं. आणि हाच मराठी एकजुटीचा परिणाम आहे. मीरारोड येथे व्यापाऱ्यांचा मोर्चा निघू शकतो पण मराठी भाषेसाठी मोर्चा निघू शकत नाही. मोर्चा काढून दिला असता तर ही वेळ आली असते का? नोटीस देऊन अटक करण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने तुम्ही मनमर्जीपणा करत असाल तर हा महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांच राज्य आहे. तसेच महिलांवर अत्याचार होत आहेत. व्यवसाय महाराष्ट्रातून काढून बाहेर जात आहेत, या सगळ्यावर UBT चे नेते राजन विचारे यांनी आपलं मत मांडल आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.